Sunday, August 17, 2025 04:54:12 AM

दमानिया शाळेत विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी केल्याच्या घटनेवर महिला नेत्या संतापल्या

दमानिया शाळेत विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. महिला नेत्यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे.

दमानिया शाळेत विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी केल्याच्या घटनेवर महिला नेत्या संतापल्या

ठाणे: शहापूरमधील रतनबाई दमानिया शाळेतील धक्कादायक प्रकार उघड झाला होता. रतनबाई दमानिया शाळेत शौचालयात रक्त पडलेलं दिसल्याने कोणत्या मुलीला मासिक पाळी आली आहे हे तपासण्यासाठी सहावी ते दहावीच्या काही विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. महिला नेत्यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे. 

'बाईपणाचे धिंदवडे काढले गेले'
शहापूरातील दमानिया शाळेतील घटना संतापजनक आहे. यावर नेतेमंडळींनी संताप व्यक्त केला आहे. घडलेली घडला संतापजनक आहे. ही आत्मसन्मानाला ठेचं पोहोचवणारी घटना आहे. या मुलींच्या मनात भीती निर्माण झाली असेल. मानसिक छळाचं वातावरण तयार झालं असेल. या घटनेमुळे बाईपणाचे धिंदवडे काढले गेले आहेत. या घटनेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना या मुलींना मानसिक आधार दिला पाहिजे. अशी घटना घडणं चुकीचं आहे, अशा वृत्तीला शिक्षा मिळणं गरजेचं आहे असे चित्र वाघ म्हणाल्या. 

हेही वाचा: आयकर विभागाच्या नोटीसवरुन शिरसाटांचं घुमजाव; श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाकडून नोटीस आल्याची कबुली

'शहापूरमधील घटना अत्यंत निंदनीय'
शहापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध आहे. या शाळेची मान्यता रद्द करणे गरजेचे आहे. पाळी आल्यानंतर शाळेने आईसारखी काळजी घ्यायला हवी. मात्र हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे असे शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे. शहापुरात दमानी शाळेत शौचालयात रक्त पडलेलं दिसल्याने कोणत्या मुलीला मासिक पाळी आली आहे हे तपासण्यासाठी सहावी ते दहावीच्या काही विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी केली. या प्रकारानंतर पालकांनी दमानिया शाळेबाहेर आणि पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले होते. 

'मुलींना विवस्त्र करण्याची घटना संवेदनाहीनतेचा कळस'
शहापूरमध्ये लहान मुलींना विवस्त्र करण्याची घटना घडली आहे. हे भयानक आहे. संवेदनाहीनतेचा कळस आहे. शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात सभागृहात देखील आवाज उठवला होता. यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ठाणे जिल्हाधिकारी यांच्याशी बोलले आहे. शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.  शहापूरमधील रतनबाई दमानी स्कूलमधील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी 8 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यात मुख्याध्यापिका, 4 शिक्षक, 2 विश्वस्था, 1 शिपाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 


सम्बन्धित सामग्री