Sunday, August 17, 2025 05:14:57 PM

AFG vs AUS: सामना पावसाने हिरावला, ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये; अफगाणिस्तानच्या आशा अजूनही जिवंत!

ICC Champions Trophy 2025 स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरूद्ध अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आले. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.

afg vs aus सामना पावसाने हिरावला ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या आशा अजूनही जिवंत
AFG vs AUS: सामना पावसाने हिरावला, ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये; अफगाणिस्तानच्या आशा अजूनही जिवंत!

लाहोर : ICC Champions Trophy 2025 स्पर्धेतील ब गटातील अत्यंत महत्त्वाचा सामना अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (AFG VS AUS )यांच्यात काल शुक्रवारी (28 फेब्रुवारी) गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना जिंकणारा संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवणार होता. पण पावसाने खोडा घातला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही. तेव्हा अखेर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामना रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ चार गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचला. तर अफगाणिस्तानचे भवितव्य इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यावर अवलंबून आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. ऑस्ट्रेलियाने चार गुणांसह गटात पहिल्या स्थानावर स्थान मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. तर अफगाणिस्तानचा संघ तीन गुणांवरच राहिला. ज्याच्या मुळे त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान धोक्यात आले आहे.

 

हेही वाचा - विराट कोहलीची फूड डायरी- 'हे' आहेत आवडते रेस्टॉरंट्स!

दक्षिण आफ्रिकेकडे देखील तीन गुण आहेत. मात्र त्यांचा नेट रनरेट अफगाणिस्तान पेक्षा चांगला आहे. अफगाणिस्तानचा नेट रनरेट मायनस 0.9 इतका आहे. तर आफ्रिकेचा प्लस 2.1 इतका आहे. अशा स्थितीत आज 1 मार्च रोजी इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास अफगाणिस्तानला संधी मिळू शकते. पण जर दक्षिण आफ्रिका सामना जिंकला किंवा कमी फरकाने हरला तर अफगाणिस्तान संघ स्पर्धेतून  बाहेर फेकला जाईल.

अफगाणिस्तानला संधी पण...

अफगाणिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा अजूनही जिवंत आहेत. पण त्यासाठी इंग्लंडने 1 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे. जर इंग्लंडने मोठा विजय मिळवला आणि दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट अफगाणिस्तानपेक्षा कमी झाला तर अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळू शकतो. पण जर दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला किंवा कमी फरकाने पराभव पत्करला तर अफगाणिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. 

 

हेही वाचा - घटस्फोटानंतर क्रिकेटपटू युजवेंद्र देणार धनश्रीला 'इतकी' पोटगी. वाचून व्हाल थक्क

ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात, पण पावसामुळे व्यत्यय
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 273 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर 274 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने 12.5 षटकांत 109 धावा केल्या होत्या आणि ते विजयाच्या दिशेने सहज वाटचाल करत होते. त्याच वेळी पावसाने सामन्यात हजेरी लावली. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने तुफानी अर्धशतक (59) ठोकले. तर स्टीव्ह स्मिथ 19 धावांवर नाबाद होता. मॅथ्यू शॉर्टने 20 धावा करून चांगली सुरुवात दिली होती. पण उमरजईने त्याला बाद करून अफगाणिस्तानला पहिली विकेट मिळवून दिली. त्याआधी अफगाणिस्तानच्या डावात सदिकुल्लाह अटल (85) आणि अजमतुल्लाह उमरजई (67) यांनी दमदार खेळी करत संघाला सुस्थितीत आणले. पण इतर फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. इब्राहिम जादरान (22), रहमत शाह (12) आणि हशमतुल्लाह शाहिदी (20) झटपट बाद झाले. ज्यामुळे अफगाणिस्तान मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वारशुइसने 3, स्पेन्सर जॉन्सन आणि एडम झाम्पाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

 


सम्बन्धित सामग्री