Kuldeep Yadav Engagement: भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादवचा बुधवारी लखनौमध्ये साखरपुडा झाला. कुलदीपने वंशिकाशी साखरपुडा केला आहे. वंशिका ही कानपूरमधील लाल बांगला येथील रहिवासी आहे. ती ऑस्ट्रेलियामध्ये काम करते आणि तिचे वडील एलआयसीमध्ये अधिकारी आहेत. कुलदीप आणि वंशिकाचा साखरपुडा लखनौमधील एका हॉटेलमध्ये झाला, ज्यामध्ये क्रिकेटपटू रिंकू सिंगनेही हजेरी लावली होती.
कुलदीप यादवचा जन्म 14 डिसेंबर 1994 रोजी उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात झाला. तो वयाच्या नऊ वर्षांपर्यंत येथेच राहिला. त्यानंतर त्याचे वडील अभ्यास आणि प्रशिक्षणासाठी कुटुंबासह कानपूरला गेले. पण कुलदीपने कधीही आपल्या जन्मभूमीपासून दूर राहिला नाही. कानपूरच्या या हिरोने संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर टीम इंडियामध्ये आपले स्थान बळकट केले आहे.
हेही वाचा - चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक जखमी
कुलदीपला पूर्वी वेगवान गोलंदाज व्हायचे होते. पण त्याच्या प्रशिक्षकाने त्याला सांगितले की, तो वेगवान गोलंदाजाऐवजी एक उत्तम फिरकी गोलंदाज बनू शकतो. यानंतर त्याने त्याची गोलंदाजीची शैली बदलली. कुलदीप यादव शेन वॉर्न आणि वसीम अक्रम यांना जगातील सर्वोत्तम गोलंदाज मानतो. कुलदीप यादव आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. तो इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचाही भाग आहे. टीम इंडियाला 20 जूनपासून इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
हेही वाचा - Chinnaswamy Stadium Stampede: RCB च्या विजयी परेड दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज अडकणार लग्नबंधनात -
दरम्यान, भारताचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंग आणि सपा खासदार प्रिया सरोज यांचाही साखरपुडा होणार आहे. त्यांच्या साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दोघेही 8 जून रोजी लखनौमध्ये साखरपुडा करणार आहेत. तथापी, यावर्षी 18 नोव्हेंबर रोजी वाराणसीतील हॉटेल ताजमध्ये त्यांचा विवाह पार पडणार आहे. रिंकू सिंगची होणारी पत्नी प्रिया सरोज या उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघाची खासदार आहे.