Friday, March 21, 2025 08:47:56 AM

हर्षित राणाच्या नावावर आगळा वेगळा विक्रम

भारत गेले 50 वर्ष एकदिवसीय सामने खेळात आहे. पण, असा विक्रम प्रथमच

हर्षित राणाच्या नावावर आगळा वेगळा विक्रम

मुंबई: भारताने इंग्लंडला पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 गडी राखून हरवलं. भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे इंग्लंड संघ जास्त मोठी धावसंख्या करू शकला नाही. या सामन्यात हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. पदार्पणात उत्तम कामगिरी करत हर्षितने इंग्लंड संघाच्या फलंदाजीचा कणा तोडला. या कामगिरीमुळे हर्षित राणाच्या नावावर एक विक्रम नोंदला गेला आहे.  

हर्षित राणा भारतीय संघाचा प्रथम गोलंदाज ठरला आहे ज्याने पहिल्या टी 20 सामन्यात, एकदिवसीय सामन्यात आणि कसोटी सामन्यात 3 किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतले आहेत. हर्षितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. उभा सामन्यात हर्षितने 117 धावा देऊन 4 गडी बाद केले होते. त्याने इंग्लंड विरुद्ध टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले यात त्याने अनुक्रमे 33 धावा देऊन 3 आणि 53 धावा देऊन 3 गडी बाद केले. असा विक्रम करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.  

याचसोबत हर्षितच्या नावावर अजून एक विक्रम नावी झाला आहे. मात्र, हा विक्रम हर्षितला त्याच्या नावावर नसलेलाच त्याला आवडेल. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये (टी 20 आणि एकदिवसीय) पदार्पणाच्या सामन्यात एका षटकात सार्वधिक धावा देण्याचा विक्रमदेखील त्याचा नावावर झाला आहे. त्याने एका षटकात 26 धावा दिल्या होत्या. हर्षितकडून भारतीय संघाला आणि भारतीय चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील. हर्षित एक उत्तम उदयोन्मुख खेळाडू आहे आणि त्याला भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून बघितलं जातं.


सम्बन्धित सामग्री