Sunday, August 17, 2025 05:14:43 PM

IND vs AUS : स्मिथ- कॅरी लढले, शमी-वरूण नडले; ऑस्ट्रेलिया ऑल आउट

भारताविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 49.3 षटकांत 264 धावांवर गारद झाला. कर्णधार स्मिथने सर्वाधिक 73 धावा केल्या. तर शमीने 3 गडी बाद केले. भारताला विजयासाठी 265 धावांचे आव्हान मिळाले.

ind vs aus  स्मिथ- कॅरी लढले शमी-वरूण नडले ऑस्ट्रेलिया ऑल आउट
IND vs AUS : स्मिथ- कॅरी लढले, शमी-वरूण नडले; ऑस्ट्रेलिया ऑल आउट

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज खेळला जात आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ 49.3 षटकांत 264 धावांवर गारद झाला. कर्णधार स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 73 धावा केल्या. तर अ‍ॅलेक्स कॅरीने 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारतासाठी मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. भारताला विजयासाठी 265 धावा कराव्या लागणार आहेत. 

ऑस्ट्रेलियाचा डाव दोन्ही डावखोर फलंदाज ट्रेविस हेड आणि कॉनोली यांनी सुरू केला. सुरुवातीलाच कॉनोली शून्यावर माघारी परतला. त्यामुळे कर्णधार स्टीव्ह स्मिथवर मोठी जबाबदारी आली. खतरनाक फलंदाज अशी ओळख असलेल्या हेडला दोन वेळा जीवदान मिळाले. त्यानंतर त्याने आक्रमक फटक मारण्यास सुरूवात केली. हेड भारतासाठी डोकेदुखी ठरू पाहत होता.

तेव्हा वरुण चक्रवर्तीने 39 धावांवर त्याला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी मिळून अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. स्मिथने 73 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर लाबुशेनने 29 धावा करून त्याला साथ दिली. पण या भागीदारीनंतर भारतीय गोलंदाजांनी पुन्हा सामना भारताच्या बाजूने वळवला. लाबुशेनची शिकार जडेजाने केली. तर त्यानंतर आलेल्या इंग्लिश देखील फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्याला व्यक्तिगत 11 धावांवर जडेजाने विराट कोहलीकरवी झेलबाद केले. तर ग्लेन मॅक्सवेलला (7) अक्षर पटेलने स्वस्तात बाद केले.

हेही वाचा - रोहित शर्माने मुंबईतील अपार्टमेंट भाड्याने दिले; दरमहा मिळणार 'इतके' भाडे

अॅलेक्स कॅरीची कडवी झुंज

ऑस्ट्रेलियाच्या डावातील सर्वात महत्त्वाची खेळी अॅलेक्स कॅरीने केली. त्याने शेवटच्या टप्प्यात आक्रमक फलंदाजी करत 57 चेंडूत 61 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 250 धावांचा टप्पा पार केला. कॅरीने 8 चौकार आणि 1 षटकार खेचत भारतीय फिरकीपटूंना बॅकफूटवर ढकलले होते. 

हेही वाचा - IPL 2025: KKR चा नवा कर्णधार जाहीर, अजिंक्य रहाणेकडं संघाची धुरा

भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात सातत्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत ठेवले. मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली. वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलनेही 1 बळी घेतला. भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला 300 धावांची मजल मारू दिली नाही.  


सम्बन्धित सामग्री