IND Vs NZ फायनलचा थरार! सामना किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येईल?
दुबई - टीम इंडिया सलग दुसऱ्या ICC स्पर्धेच्या विजेतेपदाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आज दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या ICC Champions Trophy 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत भन्नाट कामगिरी करत सलग 4 सामने जिंकले आहेत. आता हा विजयरथ कायम ठेवत Champions Trophy वर 12 वर्षांनंतर पुन्हा आपले नाव कोरण्याचा संघाचा निर्धार आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेत अजिंक्य राहून सर्वच प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्या भक्कम फलंदाजीसह, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांची फिरकी-गोलंदाजी संघाचा मोठा भक्कम आधार आहे. असे असले तरी न्यूझीलंडचा संघ नेहमीच भारतासाठी कठीण प्रतिस्पर्धी राहिला आहे. ICC स्पर्धांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताचा विक्रम 10-6 असा आहे. खासकरून नॉकआउट सामन्यांमध्ये न्यूझीलंडने भारतावर तीन विजय मिळवले आहेत. त्यामुळे भारताला न्यूझीलंडच्या ताकदीची जाणीव आहे आणि संघ कोणतीही ढिलाई न दाखवता अंतिम लढतीसाठी सज्ज आहे.
हेही वाचा - जसप्रीत बुमराह IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? मोठा खुलासा!
25 वर्षांपूर्वीचा हिशोब बाकी?
ICC Champions Trophy स्पर्धेत भारताला न्यूझीलंडविरुद्ध एक हिशोब चुकता करण्याची संधी आहे. 2000 साली उभय संघामध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचाच सामना पार पडला होता. त्यावेळी न्यूझीलंडने भारताचा पराभव करत ICC Champions Trophy वर नाव कोरलं होतं. आता भारत 25 वर्षांनी हिशोब चुकता करणार का? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा - Mohammed Shami: रोजा दरम्यान मोहम्मद शमीने एनर्जी ड्रिंक पिल्यामुळे वाद! जाणून घ्या
विजेत्या संघावर पैशांचा पाऊस!
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेच्या विजेत्या संघाला तब्बल 19.48 कोटी रुपये (2.24 दशलक्ष डॉलर्स) तर उपविजेत्याला 9.74 कोटी रुपये (1.12 दशलक्ष डॉलर्स) मिळणार आहेत.
स्थळ: दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम
वेळ: दुपारी 2.30 वाजता (भारतीय वेळेनुसार)
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
लाइव्ह स्ट्रीमिंग: जिओ सिनेमा आणि हॉटस्टार