भारतीय क्रिकेटपटू हे देशभरातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहेत. ज्याप्रमाणे क्रिकेटपटूंच्या यशामागे त्यांची आई असते, त्यासोबतच क्रिकेटपटूंच्या यशामागे त्यांची पत्नीदेखील असते जी त्याच्या चांगल्या आणि वाईट काळात त्याच्यासोबत खंबीरपणे उभी असते. तर आज आपण जाणून घेणार आहोत कोण आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि त्या सध्या काय करतात.
1. विराट कोहलीची पत्नी - अनुष्का शर्मा:
अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. 2008 मध्ये अनुष्का शर्माने वायआरएफ निर्मित 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून बॉलीवूडचा किंगखान शाहरुख खानसोबत सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तिच्या अभिनय कौशल्यामुळे ती बॉलीवूडमध्ये लोकप्रिय झाली. अनुष्का शर्मा फक्त एक अभिनेत्रीच नाही तर ती एक यशस्वी निर्मातीदेखील आहे. क्लीन स्लेट फिल्म्झ (Clean Slate Filmz) असे बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव आहे. या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून तिने अनेक चित्रपटांची निर्मिती केली. 2017 मध्ये इटलीमध्ये अनुष्का आणि विराट विवाहबद्ध झाले.
2. महेंद्रसिंग धोनीची पत्नी - साक्षी सिंह धोनी:
भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी सिंह धोनीने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असून ती एक यशस्वी उद्योजिका आहे. साक्षी सिंह धोनी ऱ्हिती स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचा भाग आहे आणि त्यासोबतच ती कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी (Corporate Social Responsibility) उपक्रमांमध्येही सक्रिय असते.त्यासोबतच, ती 'साक्षी रावत फौंडेशन' (Sakshi Rawat Foundation) नावाच्या संस्थेतून गरजू मुलांसाठी काम करते.
3. रोहित शर्माची पत्नी - रितिका सजदेह:
भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह एक व्यावसायिक स्पोर्ट्स मॅनेजर आहे. ती 'कॉर्नरस्टोन स्पोर्ट अँड एंटरटेनमेंट' (Cornerstone Sport & Entertainment) या प्रसिद्ध प्रसिद्ध स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करत होती. रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांची पहिली भेटदेखील कामाच्या निमित्ताने झाली होती. 2015 मध्ये रोहित शर्मा आणि रितिका सजदेह विवाहबंधनात अडकले.
4. के.एल.राहुलची पत्नी - अथिया शेट्टी:
अथिया शेट्टी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. 2015 मध्ये अथियाने 'हीरो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनयासोबतच अथिया फॅशन आणि ब्रँड एंडोर्समेंटमध्ये सक्रिय आहे.
5. हार्दिक पांड्याची पूर्व पत्नी - नताशा सँकोविच:
सध्या हार्दिक पंड्या आणि त्याची पूर्व पत्नी नताशा सँकोविच मूळची सर्बियाची असून भारतात ती एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नताशाने 'बिग बॉस' (Bigg Boss) आणि 'नच बलीये' (Nach Baliye) सारख्या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. त्यासोबतच, नताशा बॉलिवूडमधील अनेक म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये झळकली आहे.
6. युवराज सिंगची पत्नी - हेजल कीच:
हेजल कीचने बॉडीगार्ड (Bodyguard) चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्यासोबतच, हेजल बॉलिवूडमध्ये विविध म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातींमध्येही झळकली आहे. मात्र, विवाहानंतर ती आध्यात्मिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय आहे.
7. शिखर धवनची पूर्व पत्नी - आयेशा मुखर्जी:
आयेशा मुखर्जी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची पूर्व पत्नी आहे. आयेशा मूळची ऑस्ट्रेलियाची असून ती एक प्रशिक्षित बॉक्सर आणि फिटनेस कोच आहे. 2012 मध्ये तिने शिखर धवनसोबत लग्न केले होते. मात्र, 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.
8. अजिंक्य रहाणेची पत्नी - राधिका धोपावकर:
राधिका धोपावकर एक उद्योजिका म्हणूनही ओळखली जाते. राधिका पारंपरिक वस्त्र व्यवसाय करत आहे आणि त्यासोबत ती कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित करत आहे.
9. रविचंद्रन अश्विनची पत्नी - पृथी नारायणन:
पृथी नारायणन भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनची पत्नी आहे. पृथीने Information Technology मध्ये शिक्षण घेतले आहे. पृथी समाजसेवेसाठी विशेष ओळखली जाते आणि शिक्षणविषयक विविध उपक्रमांमध्ये सहभागी असते.
10. सुरेश रैनाची पत्नी - प्रियंका चौधरी रैना:
प्रियंका चौधरी रैनाने बँकिंग क्षेत्रात काम केले असून आता ती ग्रासिया रैना फाउंडेशन (Gracia Raina Foundation) या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला आणि बालकल्याण क्षेत्रात कार्यरत आहे.