Sunday, August 17, 2025 04:04:33 PM

Womens Asia Cup 2025: महिला इमर्जिंग आशिया कप स्पर्धा स्थगित; ACC चा मोठा निर्णय

आशियाई क्रिकेट परिषदेने 2 जून रोजी ही स्पर्धा पुढे ढकलण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही स्पर्धा 6 जूनपासून सुरू होणार होती. पण सध्या ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

womens asia cup 2025 महिला इमर्जिंग आशिया कप स्पर्धा स्थगित acc चा मोठा निर्णय
Women's Emerging Asia Cup postponed प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

Womens Asia Cup 2025: एसीसी महिला इमर्जिंग आशिया कपची दुसरी आवृत्ती श्रीलंकेत खेळवली जाणार होती. पण आता या स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिला इमर्जिंग आशिया कप अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने 2 जून रोजी ही स्पर्धा पुढे ढकलण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही स्पर्धा 6 जूनपासून सुरू होणार होती. पण सध्या ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. स्पर्धेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असं ACC ने सांगितलं आहे.

हेही वाचा -  विराट कोहलीच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट 'वन 8 कम्यून' विरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

आशियाई क्रिकेट परिषदेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने म्हटले आहे की श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) ने त्यांच्या क्षेत्रातील प्रतिकूल हवामान आणि आरोग्याच्या चिंतांमुळे या स्पर्धेचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली होती. म्हणूनच स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचा - राजीव शुक्ला असणार BCCI चे कार्यवाहक अध्यक्ष; रॉजर बिन्नीची घेणार जागा

दरम्यान, महिला इमर्जिंग आशिया कपचे पहिले विजेतेपद 2023 मध्ये खेळवण्यात आले होते. हाँगकाँगमध्ये खेळवण्यात आलेली ही स्पर्धा भारताने जिंकली. अंतिम सामन्यात बांगलादेश अ संघाला 31 धावांनी हरवून भारत अ संघाने विजेतेपद पटकावले. भारत अ, बांगलादेश अ, पाकिस्तान अ, श्रीलंका अ, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, यजमान हाँगकाँग आणि मलेशिया या स्पर्धेत सहभागी झाले होते.
 


सम्बन्धित सामग्री