Saturday, August 16, 2025 08:10:22 AM

एआयमुळे गुन्हेगारीला आळा बसणार

आजकालच्या या आधुनिक युगात प्रत्येक जण टेक्नोलॉजीचा वापर करतो. सद्याच्या या युगात असं कोणतंही क्षेत्र नाही ज्यात टेक्नोलॉजीचा वापर केला जात नाही.

एआयमुळे गुन्हेगारीला आळा बसणार

आजकालच्या या आधुनिक युगात प्रत्येक जण टेक्नोलॉजीचा वापर करतो. सद्याच्या या युगात असं कोणतंही क्षेत्र नाही ज्यात टेक्नोलॉजीचा वापर केला जात नाही. तरुण त्याचबरोबर वयोवृद्ध देखील आता सर्वत्र एआयचा वापर करू लागलेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलीय. काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहुयात: 

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
एक महिन्याचे १० वेगवेगळ्या शहरातील फुटेज आपण एआयला दिले, तर फक्त 10 ते 15 मिनिटांत रे टूल शोधून काढते, अशाप्रकारची कॅपॅबिलीटी तयार झाली आहे. ३ ते ४ वर्षांपूर्वीचा डाटा मायनिंग शोधावा लागायचा आता एआय लगेच करून देते. सीसीटीव्ही मध्ये एआयचा वापर करत आहोत
त्याचा वापर ट्राफिक मॅनेजमेंट मध्ये करणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. 

हेही वाचा: नागपूरच्या राड्या मागचा मास्टरमाईंड अखेर सापडला..

दरम्यान शहरातील फुटेज एआयला दिले, तर फक्त 10 ते 15 मिनिटांत रे टूल शोधून काढत असल्याने याचा मोठा फायदा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी होणार आहे. यामुळे पोलीस प्रशासनाला या एआयचा फायदा होणार असून गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार आहे. 

रे टूल म्हणजे काय? 
रे टूल (Regular Expression Tool) हा एक तंत्रज्ञानातील साधन (tool) आहे, जो नियमित अभिव्यक्ती (Regular Expressions - RegEx) वापरून मजकूरामधून विशिष्ट नमुने (patterns) शोधण्यासाठी, फिल्टर करण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी वापरला जातो.

रे टूलचे उपयोग:
मजकूर शोधणे आणि फिल्टर करणे – मोठ्या दस्तऐवजांमध्ये किंवा डेटामध्ये आवश्यक माहिती शोधण्यासाठी.
मजकूर पुनर्स्थित (Replace) करणे – दिलेल्या विशिष्ट स्वरूपाचा मजकूर बदलण्यासाठी.
डेटा पडताळणी (Validation) – ईमेल, फोन नंबर, पिनकोड यांसारख्या माहितीची सत्यता तपासण्यासाठी.
वेबस्क्रॅपिंग आणि डेटा एक्स्ट्रॅक्शन – वेबसाइटवरील विशिष्ट डेटा वेगळा काढण्यासाठी.
प्रोग्रॅमिंगमध्ये वापर – विविध प्रोग्रॅमिंग भाषांमध्ये टेक्स्ट प्रोसेसिंगसाठी.

रे टूल कुठे वापरले जाते?
वेब डेव्हलपमेंट
डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग
लॉग फाइल विश्लेषण
सायबरसुरक्षा आणि फोरेन्सिक्स
NLP (Natural Language Processing)


 


सम्बन्धित सामग्री