What Happens If Fan and AC Are Run Together?: घर, ऑफिसमध्ये एसीचा वापर होणं, ही बाब आता सामान्य झाली आहे. खोलीतील तापमान हव्या त्या मर्यादेत ठेवण्यासाठी किंवा सामान्य ठेवण्यासाठी एसीचा वापर केला जातो. उन्हाळ्यात बाहेरील हवा उष्णतेमुळे गरम झालेली असते. तर, थंडीमध्ये ती थंड झालेली असते.
अति उष्णता किंवा अति थंडी या दोन्हींवरही उपाय म्हणून खोलीत योग्य तापमान राखण्यासाठी एसी चालवला जातो. पण अशाच पद्धतीने दिवसातून किंवा रात्री 8 ते 9 तास एसी चालवायला सुरुवात केली तर, विजेचे बिल खूप येते. वीज बिल 1000 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत वाढते. बरेच लोक वीज बिल कमी करण्यासाठी एसीसोबत पंखे देखील चालवतात. असं केल्याने वीजबिल वाढेल, असं काही जणांना वाटू शकतं. मात्र, ही एक ट्रिक आहे. वीजबिल कमी करण्यासाठी ती वापरली जाते. तर एसीसोबत पंखा चालवल्याने खरोखरच वीज बिल कमी होते का? एसी आणि पंखा सोबतच चालवल्याने वीज बिलावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.
हेही वाचा - किती वेळानंतर एसी बंद करावा? 90 टक्के लोकांना याचं उत्तर माहीत नाही
एसीतून येणारी थंडी किंवा उष्णता लवकर पसरते : एसीसोबत पंखा चालवल्याने खोलीतील तापमान लवकर समसमान होते. पंखा संपूर्ण खोलीत हवा फिरवतो, त्यामुळे एसीला जास्त काम करावे लागत नाही. यामुळे एसी कॉम्प्रेसर कमी वेळ चालतो आणि वीज वापर कमी होतो.
इथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, पंखा देखील वीज वापरतो, परंतु त्याचा वापर एसीपेक्षा खूपच कमी असतो. म्हणून, जर तुम्ही एसीसोबत पंखा चालवला तर तुम्ही एकूणच वीज वाचवू शकता.
एसीचं तापमान बाहेरील तापमानापेक्षा फार कमी किंवा जास्त ठेवू नका : एसीमुळे घरात तयार होणारे तापमान आणि घराबाहेर असलेले तापमान यात जास्त तफावत ठेवू नका. असे केल्याने वीज बिल वाढते. जर, तुम्ही तुमचा एसी सामान्य 28-29 अंश सेल्सिअस तापमान राखण्यासाठी चालवला आणि त्यासोबत पंखा चालवला तर वीज बिल नियंत्रित करता येते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एसी चालू कराल तेव्हा पंखाही चालू ठेवा आणि तुमचे वीज बिल कसे कमी होते ते पाहा. याशिवाय, बाहेरील आणि घरातील तापमानात फार तफावत नसल्यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहील.
हेही वाचा - डक्ट एअर कूलर एसीपेक्षाही फायदेशीर; फक्त एक खोली नाही तर संपूर्ण घर थंड होईल!