Sunday, May 18, 2025 02:39:05 PM

WhatsApp वर फोटो पाठवून Scammer घालत आहेत लाखो रुपयांचा गंडा; फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

अलिकडेच एक नवीन घोटाळा समोर आला आहे ज्यामध्ये फसवणूक करणारे व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या सामान्य दिसणाऱ्या इमेज फाइल्सद्वारे वापरकर्त्यांना फसवत आहेत.

whatsapp वर फोटो पाठवून scammer घालत आहेत लाखो रुपयांचा गंडा फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स
WhatsApp Image Scam
Edited Image

WhatsApp Image Scam: व्हॉट्सअॅपवर फसवणूक आणि सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार धोकादायक लिंक्स, ओटीपी स्कॅम आणि 'डिजिटल अरेस्ट' सारख्या नवीन युक्त्यांद्वारे लोकांना लक्ष्य करत आहेत. अलिकडेच एक नवीन घोटाळा समोर आला आहे ज्यामध्ये फसवणूक करणारे व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या सामान्य दिसणाऱ्या इमेज फाइल्सद्वारे वापरकर्त्यांना फसवत आहेत. या इमेज फाइल्समध्ये लपलेले मालवेअर सिस्टममध्ये प्रवेश करते आणि आर्थिक नुकसान करते. 

'व्हॉट्सअॅप इमेज स्कॅम' म्हणजे काय?

या फसवणुकीत, लोकांना एक इमेज फाइल पाठवली जाते ज्यामध्ये लपलेले मालवेअर असते. या तंत्राला 'स्टेगॅनोग्राफी' म्हणतात, ज्यामध्ये प्रतिमेमध्ये एक धोकादायक कोड लपलेला असतो. वापरकर्ता ती प्रतिमा डाउनलोड करून उघडताच, मालवेअर सक्रिय होते आणि डिव्हाइसवर हल्ला करते.

हेही वाचा - Google Layoffs: गुगलचा पुन्हा शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ! 'या' कारणामुळे केली कर्मचारी कपात

यातील अनेक प्रकरणांमध्ये वापरकर्त्याला कोणत्याही प्रकारचा ओटीपी किंवा अलर्ट मिळत नाही, कारण हे मालवेअर बँकिंग तपशील, पासवर्ड इत्यादी संवेदनशील माहितीला थेट लक्ष्य करते. काही प्रकरणांमध्ये, ते स्कॅमरना वापरकर्त्याच्या फोन किंवा लॅपटॉपवर रिमोट अॅक्सेस देखील देते. सायबर तज्ञांनी वापरकर्त्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अज्ञात स्त्रोताकडून पाठवलेली कोणतीही प्रतिमा फाइल उघडू नका, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा - PAN-Aadhaar Linking Deadline: 'या' तारखेपर्यंत आधार-पॅन लिंक करा! अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

व्हॉट्सअॅप इमेज स्कॅम टाळण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा - 

- कोणत्याही अनोळखी नंबरवरून कोणताही फोटो किंवा फाइल डाउनलोड करू नका. व्हॉट्सअॅप सेटिंग्जमध्ये जाऊन ऑटो-डाउनलोड फीचर बंद करा.
- सुरक्षा पॅचेस अद्ययावत ठेवण्यासाठी तुमचे डिव्हाइस वेळोवेळी अपडेट करत रहा.
- कोणतेही अनोळखी किंवा संशयास्पद कॉल टाळा आणि असे नंबर ताबडतोब ब्लॉक करा.
- कृपया अशा फसवणुकींबद्दलची माहिती तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना द्या, जेणेकरून ते देखील सतर्क राहतील.
- सायबर फसवणुकीची कोणतीही घटना घडल्यास, भारत सरकारच्या अधिकृत सायबर क्राइम पोर्टल https://cybercrime.gov.in वर त्वरित तक्रार दाखल करा.
 


सम्बन्धित सामग्री