PAN-Aadhaar Linking Deadline: सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. यापूर्वी आधार-पॅन लिंक करण्यासाठी सरकारने अनेक वेळा मुदत वाढवली आहे. यानंतरही, अनेकांनी पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही. अशा लोकांसाठी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच CBDT ने एक अधिसूचना जारी केली आहे.
31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत -
या सूचना अशा पॅन धारकांसाठी आहेत ज्यांनी 1 ऑक्टोबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या आधार अर्जाचा नोंदणी आयडी देऊन त्यांचे पॅन कार्ड मिळवले आहे. या सर्व पॅन धारकांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्यांचा आधार क्रमांक आयकर विभागाला द्यावा लागेल.
हेही वाचा - UPI Down: यूपीआय सर्व्हर पुन्हा डाउन! GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना
निष्क्रिय पॅन कार्डमुळे येऊ शकतात अनेक समस्या -
जर पॅन कार्ड निष्क्रिय असेल तर अशा लोकांना म्युच्युअल फंड किंवा स्टॉक अकाउंट उघडण्यासारख्या गोष्टी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. निष्क्रिय पॅन कार्डधारकांना 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात तुम्हाला अडचणी येतील. तुम्ही बँकांमधून 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा किंवा काढू शकणार नाही.
निष्क्रिय पॅन कार्ड वापरल्यास दंड -
जर तुम्ही कुठेही निष्क्रिय पॅन कार्ड कागदपत्र म्हणून वापरत असाल तर आयकर कायदा 1961 च्या कलम 272ब अंतर्गत तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
हेही वाचा - तुम्ही तुमचा UAN विसरला आहात का? EPFO पोर्टलवरून 'अशा' पद्धतीने करा रिकव्हर
पॅन-आधार लिंक करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया -
सर्वप्रथम, तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट www.inmcoetax.gov.in वर जावे लागेल. आता तुम्हाला 'लिंक आधार'चा पर्याय निवडावा लागेल. यानंतर, तुमचा आधार क्रमांक, पॅन क्रमांक यासारखी आवश्यक माहिती भरा. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. याद्वारे तपशीलांची पडताळणी करा. यानंतर तुमचा पॅन आणि आधार लिंक होईल.