US New Travel Ban Order: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सतत अनेक मोठे निर्णय घेत आहेत. आता ट्रम्प लवकरच एक-दोन नाही तर 41 देशांना धक्का देणार आहेत. ट्रम्प लवकरच अनेक देशांवर नवीन प्रवास बंदी घालण्याची तयारी करत आहेत. या यादीत 41 देशांची नावे समाविष्ट आहेत.
अमेरिकेत प्रवास बंदी घालण्यात आलेले देश -
डोनाल्ड ट्रम्प लवकरच एक नवीन आदेश जारी करणार आहेत, ज्या अंतर्गत पाकिस्तानसह 41 देशांवर प्रवास बंदी घातली जाईल. या संदर्भात, 10 देशांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अफगाणिस्तान, इराण, सीरिया, क्युबा आणि उत्तर कोरिया सारख्या अनेक देशांचा समावेश आहे. या देशांचे व्हिसा पूर्णपणे निलंबित केले जातील.
हेही वाचा -'पाकिस्तान निव्वळ थापा मारत आहे!,' जाफर एक्सप्रेस अपहरणासंदर्भात बलुच चळवळीतील कार्यकर्त्याचा आरोप
दुसऱ्या यादीत 5 देशांचा समावेश -
रिपोर्टनुसार, दुसऱ्या यादीत 5 देशांची नावे असतील ज्यांचे व्हिसा अंशतः निलंबित केले जातील. या यादीत इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार आणि दक्षिण सुदान या देशांची नावे असणार आहेत. याचा परिणाम पर्यटक आणि विद्यार्थी व्हिसावर तसेच स्थलांतरित व्हिसावर होऊ शकतो.
तथापि, अमेरिकेतील प्रवास बंदीच्या तिसऱ्या यादीत पाकिस्तान आणि भूतानसह 26 देशांचा समावेश केला जाईल. या देशांच्या नागरिकांचे व्हिसा देखील अंशतः बंदी घालण्यात येईल. जर या देशांच्या सरकारने 60 दिवसांच्या आत सर्व व्हिसातील कमतरता दूर केल्या नाहीत तर व्हिसा निलंबित केला जाईल.
हेही वाचा - युक्रेन 30 दिवसांच्या युद्धबंदीसाठी तयार, अमेरिकेची सौदी अरेबियातून घोषणा; आता चेंडू पुतिन यांच्या कोर्टात
ट्रम्प प्रशासनाच्या मंजूरीनंतर लागून होणार निर्णय -
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोसह संपूर्ण ट्रम्प प्रशासन या नवीन प्रवास बंदीला मान्यता देईल. त्यानंतर ती अमेरिकेत लागू केली जाऊ शकते. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 7 मुस्लिम देशांवर प्रवास बंदी घातली होती.