Sunday, August 17, 2025 03:52:23 PM

Operation Sindoor: सॅटेलाइट फोटोने उघड केलं पाकिस्तानचं विध्वंसित रूप

मुजफ्फराबाद, मुरीदके, बहावलपूर या ठिकाणांवर अर्ध्या तासात झालेल्या कारवाईचे सॅटेलाइट फोटो आता समोर आले आहेत.

operation sindoor सॅटेलाइट फोटोने उघड केलं पाकिस्तानचं विध्वंसित रूप

नवी दिल्ली: पाकिस्तानवर भारताने मंगळवारी उशिरा ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत निर्णायक कारवाई केली. पहलगाममध्ये  झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर मिसाइल्सद्वारे तडाखा दिला. मुजफ्फराबाद, मुरीदके, बहावलपूर या ठिकाणांवर अर्ध्या तासात झालेल्या कारवाईचे सॅटेलाइट फोटो आता समोर आले आहेत. या फोटोंमध्ये हल्ल्यापूर्वी आणि नंतरचा बदल स्पष्टपणे पाहायला मिळतो.

बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्य ठिकाणावर हल्ला करण्यात आला. हवाई हल्ल्यामुळे अनेक इमारतींचा पूर्णपणे नाश झाला असून, मसूद अजहरच्या कुटुंबातील काही सदस्य मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाली आहे.  दुसरीकडे, लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयावरही हल्ला करून प्रशासकीय इमारती व मस्जिद उध्वस्त करण्यात आल्या. हे दृश्य सॅटेलाइट छायाचित्रांमधूनही स्पष्ट दिसते.

हेही वाचा: Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल जगभरातून काय प्रतिक्रिया उमटल्या?

 पूँछमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, नागरिकांचा बळी
ऑपरेशननंतर पाकिस्तानने जम्मू काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात गोळीबार सुरू केला. या गोळीबारात काही निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. भारतानेही याचे कडक प्रत्युत्तर देत सीमेवर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

या गोळीबारात भारतीय लष्कराचे लान्स नायक दिनेश कुमार शहीद झाले. ते 5 फिल्ड रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. व्हाइट नाइट कोरने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांचं बलिदान राष्ट्रासाठी अजरामर राहील, असं सैन्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.या घटनेनंतर सीमाभागात दहशतीचं वातावरण पसरलं असून, स्थानिक प्रशासन सतर्क आहे.

 

'>http://

 


सम्बन्धित सामग्री






Live TV