नवी दिल्ली : आजकाल अमेरिकेत महागाईने लोकांना त्रास दिला आहे. लोक महागाईने इतके त्रस्त आहेत की ते अंड्यांची तस्करी देखील करू लागले आहेत. द लॉजिकच्या अहवालानुसार, फेंटानिल औषधांपेक्षा कॅनडामधून अमेरिकेत जास्त अंड्यांची तस्करी केली जात आहेत.
बर्ड फ्लूमुळे तस्करी वाढली
कॅनडामधून अमेरिकेत अंड्यांची तस्करी करणे ही आजची सर्वात महागडी बेकायदेशीर वाहतूक बनली आहे. यामागील कारण अमेरिकेत पसरलेला बर्ड फ्लू असल्याचे सांगितले जात आहे. अधिकृत आयात आणि जप्तीच्या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर अहवालात असे म्हटले आहे की अमेरिकन कस्टम अधिकारी फेंटॅनिल औषधांपेक्षा अंड्यांसह अधिक पोल्ट्री उत्पादने जप्त करत आहेत. तथापि, अमेरिका आणि कॅनडामधील सुरू असलेल्या टॅरिफ वॉरच्या केंद्रस्थानी फेंटॅनिल औषधे आहेत.
हेही वाचा : राज्यातील 30 टक्के कुटुंबांचे स्वस्त धान्य बंद होणार
तस्करीत 36 टक्के वाढ झाली
गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून अमेरिकेत अंडी तस्करी करणाऱ्या लोकांच्या संख्येत 36 टक्क्यांनी वाढ झाल्याचे वृत्त आहे. खरंतर बर्ड फ्लूमुळे किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अहवालानुसार, ऑक्टोबर 2024 पासून आतापर्यंत अमेरिकन कस्टम अधिकाऱ्यांनी पक्षी आणि पोल्ट्रीशी संबंधित 3 हजार 768 उत्पादने जप्त केली आहेत. या कालावधीत, पेंट्रोनिल औषधांच्या फक्त 352 जप्तीची नोंद झाली.
तस्करांवर 300 डॉलर दंड आकारला जाईल
अहवालानुसार, वाढत्या बर्ड फ्लूच्या भीतीमुळे अमेरिकेत प्रक्रिया न केलेल्या पक्षांची उत्पादने बेकायदेशीर आहेत आणि या काळात सीमेपलीकडून अंडी तस्करी करताना पकडल्या गेलेल्या कोणालाही 300 अमेरिकन डॉलर्सपर्यंत दंड होऊ शकतो.