जय महाराष्ट्र न्यूज, उमरेड
उमरेड करांडलातून पुन्हा एक वाघ गायब झाला असल्याची शक्यता वनविभागातर्फे वर्तवली जात आहे. आशियातील सर्वात मोठा वाघ अशी ओळख असलेला जय वाघ बेपत्ता होऊन वर्ष उलटल्यानंतर त्याच जय वाघाचा बछडा असलेला
श्रीनिवासन वाघही बेपत्ता झाला आहे.
टी-टेन हे तांत्रिक नाव असलेल्या श्रीनिवासन वाघाची केवळ कॉलर आयडी सापडल्याने वनविभागाचे धाबे दणाणले असून, त्याचा आता कॅमेरा ट्रॅप लावून शोध घेतला जात आहे.
उमरेड करांडला ते नागभीड वनपरिक्षेत्रात या श्रीनिवासन वाघाचं वास्तव्य होतं.
अवघं 4 वर्षं वयोमान असलेल्या श्रीनिवासना 16 डिसेंबर 2016रोजी कॉलर आयडी लावण्यात आलं होते.
अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी श्रीनिवासन वाघाचं लोकेशन आढळून आल्यानंतर त्याचा शोध घेतला असता, धक्कादायक बाब समोर आली.