Sunday, August 17, 2025 05:00:30 AM

कुपवाड्यामध्ये दहशतवादी हल्ल्यात 3 जवानांना वीरमरण, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

कुपवाड्यामध्ये दहशतवादी हल्ल्यात 3 जवानांना वीरमरण, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

वृत्तसंस्था, कुपवाडा

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. पंचगाम येथे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कर कॅम्पवर हल्ला केला.

लष्कराने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं असून दोन दहशतवाद्यांना ठार केलं. मात्र दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एक मेजर, एक जेसीओ आणि एका जवानाचा समावेश आहे.

नियंत्रण रेषेजवळ असलेल्या लष्करी कॅम्पमध्ये आत्मघाती स्फोट घडवण्याच्या हेतूने घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, लष्कराने त्यांचा डाव उधळत चोख प्रत्युत्तर दिलं.


सम्बन्धित सामग्री