जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
दारूमुक्त महाराष्ट्रासाठी भूमाता ब्रिगेडनं सांगलीच्या तासगावात एल्गार पुकारला आहे. तृप्ती देसाईंच्या नेतृत्वात महिलांनी तासगाव तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
दारूबंदी झाली नाही तर राज्यभर आंदोलन छेडणार असा इशारा तृप्ती देसाईंनी दिला. तसंच राज्य महामार्ग महापालिकेला हस्तांतरीत करण्याचा डाव केला, तर महापौरांना काळं फासणार असा इशाराही तृप्ती देसाईंनी दिला.