Sunday, August 17, 2025 06:00:09 AM

शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा एल्गार, उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद

शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा एल्गार, उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

भाजपला शह देण्याकरता शिवसेनेने नाशिकमध्ये कृषी अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. मी कर्ज मुक्त होणार हे घोषवाक्य देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे सर्वच मंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.



शेतमालाला न मिळणारा भाव, वाढत्या शेतकरी आत्महत्या यामुळे सत्तेतील मित्रपक्ष शिवसेनेने भाजपविरोधात एल्गार पुकारला आहे. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांबरोबर गावरान पद्धतीच जेवण करणार आहे.

 

गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे अधिवेशनाचं उदघाटन होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी एकाच व्यसपीठवर असणार आहे.

 

शेतकरी कर्ज माफी सोबतच समृद्धी महामार्गत जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाबत ही शिवसेना आवाज उठवणार आहे.


सम्बन्धित सामग्री