जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणारे शेतकरी विजय जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विजय जाधव आज सकाळी विधानभवनाबाहेर निदर्शन करणार होते. मात्र, तत्पूर्वीच मध्यरात्री मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यामुळे आझाद मैदान पोलिसांच्या देखरेखीत पोलीस स्टेशन परिसरात विजय जाधवांनी निदर्शन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनसी सरकारला जाग
आणण्यासाठी नाशिकमधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी जमा करुन विजय जाधवांनी मुंबईपर्यंत अस्थिकलश दर्शनयात्रा काढली होती.
या यात्रेची दखल सरकारने घेतली नाही. तर, महाराष्ट्रातील ‘भोगी सरकार विरोधात उत्तर प्रदेशच्या ‘योगी सरकारकडे दाद मागण्यासाठी यात्रा करण्याचा निर्धारसुद्धा
जाधव यांनी केला.