Saturday, November 15, 2025 10:56:11 AM

साताऱ्यातील बड्या नेत्याच्या घरी छापेमारी

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा येथील घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे.

साताऱ्यातील बड्या नेत्याच्या घरी छापेमारी

सातारा : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा येथील घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. तसेच पुण्यातील प्रभात रोड येथे एका इमारतीतही छापेमारी करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रघुनाथराजे आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आणि गोविंद दूध डेअरी वर धाड टाकली आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. तसेच गोविंद दूध डेअरीवरही आयकर विभागाने धाड टाकली आहे. एकाचवेळी पुणे, मुंबई आणि फलटण येथील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे. विविध ठिकाणच्या आर्थिक व्यवहाराबाबत अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.

 

हेही वाचा : शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा- छगन भुजबळ

 

संजीवराजे निंबाळकरांचे कार्यकर्ते आक्रमक

आयकर विभागाने केलेल्या छापमारीनंतर संजीवराजे निंबाळकरांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आयकर विभागाने केलेल्या छापेमारीचा निषेध त्यांच्याकडून करण्यात येत आहे. संजीवराजे निंबाळकरांच्या फलटण आणि पुण्यातील घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तसेच गोविंद मिल्क प्रकल्पाचीही चौकशी सुरु आहे. राजकीय आकसापोटी कारवाई होत असल्याचा आरोप होत आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर निवडणुकीआधी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. 

 

हेही वाचा : फॅक्ट चेक: मसालेदार चिकन-मटण खाल्ल्यावर हृदयविकाराचा झटका? तज्ज्ञांचे स्पष्टीकरण!

आयकर विभागाच्या कारवाईचा चव्हाणांकडून निषेध

रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांच्या फलटण आणि पुणे येथील निवासस्थानी आज आयकर विभागाचे छापे पडले आहेत. त्यासह त्यांच्या गोविंद मिल्क या प्रकल्पवरही आयकर विभागाचे पथक चौकशी करत आहे. आयकर विभागाच्या छाप्यानंतर संजीवराजे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून या कारवाईवर फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आयकर विभागाच्या कारवाईचा चव्हाण यांनी निषेध केला असून राजकीय आकस बाळगून ही कारवाई होत असल्याचा आरोप माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केला आहे.

 

 

 


 


ganesh-temkar-death-mystery-bjp-yuva-morcha-missing-case
Sambhajinagar Crime : संभाजीनगर हादरलं! नळकांडी पुलाजवळ भाजप नेत्याची डेड बॉडी सापडली, घातपाताचा संशय; कारण...

दोन्ही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या टेमकर यांचा मृत्यू आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून पुढील माहिती येणार आहे.

Jai Maharashtra News

sambhajinagar crime  संभाजीनगर हादरलं नळकांडी पुलाजवळ भाजप नेत्याची डेड बॉडी सापडली घातपाताचा संशय कारण

विजय चिडे, प्रतिनिधी,

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांच्या मृतदेहाचा शोध लागल्यानंतर परिसरात एकच गडबड निर्माण झाली आहे. फक्त 30 वर्षांच्या गणेश टेमकर यांच्या मृत्यूमागे नेमके काय घडले? हा अपघात होता की आत्महत्या की थेट घातपात? या प्रश्नांनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गणेश टेमकर यांचा मृतदेह हदीयाबाद - मारवाडी महामार्गावरील नळकांडी पुलाजवळ मिळाला आहे. पक्षात सक्रिय असलेले, मेहनती आणि प्रभावी भूमिका बजावणाऱ्या टेमकर यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट उभे राहिले आहे. आई-वडील, भाऊ आणि बहिण अशा परिवारात गणेश हे महत्त्वाचे आणि सतत संघटनात गुंतलेले व्यक्तिमत्व होते.

गणेश टेमकर, राहणार भालगाव, तालुका गंगापूर, हे दोन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीय, मित्र, नातेवाईक, पक्षाचे कार्यकर्ते यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांचा कुठेच शोध लागत नव्हता. मात्र, शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नळकांडी पुलाजवळ त्यांचा मृतदेह मिळाला आणि या प्रकरणाला रहस्यमय वळण मिळाले. स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि गौरव विधाते यांनी तात्काळ पोलीसांना यासंदर्भात कळवले. पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड पथकासह घटनास्थळी लगेचच पाहणी साठी गेले. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला, जिथे डॉक्टरांनी तपासून ते मृत असल्याचे जाहीर केले. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी सुरू केली असून, मृत्यूच्या ठिकाणाचे स्वरूप, शरीरावरील जखमा आणि मिळालेल्या प्राथमिक माहितीमुळे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा स्थानिकांमध्ये वेगाने पसरली आहे. काही जणांच्या मते, गणेश टेमकर हे पक्षातील सक्रिय आणि ओळख असलेले पदाधिकारी असल्याने प्रकरणाच्या मागे वेगळेच धागेदोरे असू शकतात.

गणेश टेमकर यांच्या अचानक आणि संशयास्पद मृत्यूमुळे गंगापूर तालुका तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तपास वाढत असताना पुढील काही तास आणि दिवस हे प्रकरण काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Nowgam Blast: श्रीनगरमध्ये नौगाम पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट; नऊ जणांचा मृत्यू, 29 जखमी