Sunday, August 17, 2025 08:03:00 AM

Prasad Oak: ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री नटराजाचा आशीर्वाद !

दिग्दर्शक प्रसाद ओक याने या बद्दल सोशल मीडिया वर एक पोस्ट लिहून या बद्दल माहिती दिली असून प्रसाद बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय

prasad oak ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री नटराजाचा आशीर्वाद

मुंबई: मराठी सिनेमा विश्वात आजवर अनेक महान लोकांचे चरित्रपट होऊन गेले आणि नव्या वर्षात अश्याच एका महान व्यक्तीची गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे ! ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टी उभी केली जात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव " बाबुराव पेंटर " 

मराठी सिनमांमध्ये हल्ली वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपट होताना दिसतात आणि आता अश्या एका महान व्यक्तीवर चित्रपट होतोय ही मराठी सिनेमा विश्वा साठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. 

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रसाद ओक याने या बद्दल सोशल मीडिया वर एक पोस्ट लिहून या बद्दल माहिती दिली असून प्रसाद बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. या बद्दल बोलताना प्रसाद सांगतो " बाबुराव पेंटर यांच्या जीवनाराव आधारित भव्य कलाकृती निर्माण होत आहे आणि चित्रपटाची संपूर्ण टीम त्यासाठी झटून काम करत आहेत. दिग्गज बाबुराव पेंटर यांची भूमिका मला साकारायला मिळणं हा श्री नटराजा आणि गणपती बाप्पाचा मला मिळालेला आशीर्वाद आहे"

आता या चित्रपटात अजून कोण कोण दिसणार कधी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार काय गोष्ट असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 2025 वर्षात प्रसाद ओक अनेक चित्रपट करणार असून आता या चित्रपटासाठी देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


सम्बन्धित सामग्री