Thursday, July 17, 2025 02:49:11 AM

61 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीचे नामांकने जाहीर

61 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.

61 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीचे नामांकने जाहीर

मुंबई: 61 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. नामांकने प्राप्त झालेले कलाकार तसेच पुरस्कार प्राप्त तांत्रिक व  बालकलाकार यांचे मंत्री आशिष शेलार , सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. 

सन 2023 या वर्षातील 61 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी आत्मपॅम्प्लेट, जिप्सी, नाळ 2, रौंदळ, तेरवं, जग्गु आणि ज्युलिएट, भेरा, आशा, झिम्मा 2, अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या दहा चित्रपटांना अंतिम फेरीकरीता नामांकन प्राप्त झाले आहे. 

तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून कबीर खंदारे (जिप्सी) व त्रिशा ठोसर (नाळ 2) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन अमेय भालेराव (श्यामची आई), उत्कृष्ट छाया लेखन प्रवीण सोनावणे, (जिप्सी), उत्कृष्ट संकलन अक्षय शिंदे (जिप्सी), उत्कृष्ट ध्वनिमुद्रण कुणाल लोळसुरे (श्यामची आई), उत्कृष्ट ध्वनी संयोजन विकास खंदारे (जिप्सी), उत्कृष्ट वेशभूषा मानसी अत्तरदे (जग्गु आणि ज्युलिएट), उत्कृष्ट रंगभूषा हमीद शेख, मनाली भोसले (हजार वेळा शोले पाहिलेला माणूस) यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.  

पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण 49 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण विजय पाटकर, भार्गवी चिरमुले, प्रसन्ना कारखानीस, संजय धारणकर क्षितिजा खंडागळे, अतुल देशपांडे, अंजली खोबरेकर,  अतूल शिधये, गणेश पंडित, अरुण म्हात्रे, आशिष केसकर, विठ्ठल पाटील, अर्चना पाटकर, राजन बने, अमित भंडारी यांनी केले होते. 

हेही वाचा : 'नगरविकास विभागाने वाहतूकीच्या नियमावलीमध्ये बदल करणेचे आवश्यक'

नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे :

सर्वोत्कृष्ट कथा : 1. सुधाकर रेड्डी (नाळ 2) 2. परेश मोकाशी (आत्मपॅम्प्लेट) 3. शशिकांत खंदारे (जिप्सी)

उत्कृष्ट पटकथा : 1. श्याम पेठकर (तेरवं) 2. परेश मोकाशी (आत्मपॅम्प्लेट) शशिकांत खंदारे (जिप्सी) 

उत्कृष्ट संवाद: 1. विवेक बेळे (अलीबाबा आणि चाळीशीतले चोर) 2. परेश मोकाशी (आत्मपॅम्प्लेट) 3. अंबर हडप, गणेश पंडीत (जग्गु आणि ज्युलिएट)

उत्कृष्ट गीते: 1. विनायक पवार (टी.डी.एम, गाणे : एक फूल तुला वाहते) 2. वैभव देशमुख (नाळ 2, गाणे- गरगरा भिंगोरी) 3. क्षितीज पटवर्धन : (झिम्मा 2, गाणे-ओंजळीत तुझे तुझे)

उत्कृष्ट संगीत : 1. विरेंद्र लाटणकर (तेरवं) 2. अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर) 3. ए.वी.प्रफुल्लचंद्र (नाळ 2)

उत्कृष्ट पार्श्वसंगीत : 1. आशिष झा (आशा) 2. विरेंद्र लाटणकर (तेरवं) 3. अद्वैत नेमळेकर (नाळ 2) 

उत्कृष्ट पार्श्वगायक: 1. मोहित चौहान (घर बंदुक बिर्याणी, गीत - घर बंदुक बिर्याणी) 2. अजय गोगावले (महाराष्ट्र शाहीर, गीत - पाऊल थकले नाही) 3. स्वप्नील बांदोडकर (फुलराणी, गीत : तुझ्या सोबतीने)

उत्कृष्ट पार्श्वगायिका: 1. श्रेया घोषाल (झिम्मा 2, गीत - रंग ओला) 2. रुचा बोंद्रे (श्यामची आई, गीत- भरजरी ग पितांबर) 3. वैशाली माडे (रौंदळ, गीत - मन बहरलं ग)

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक : 1.राहूल ठोंबरे-संजीर हवालदार (जग्गु आणि ज्युलिएट, गीत : तु बी आणि मी बी) 2. रंजू वर्गेहेस (अफलातून, गीत- माका नाका) 3. राहूल ठोंबरे, संजीर हवालदार (जग्गु आणि ज्युलिएट, गीत - भावी आमदार)

उत्कृष्ट अभिनेता: 1. श्रीधर वाटसर (शॉर्ट अॅण्ड स्वीट), 2. अमेय वाघ (जग्गु आणि ज्युलिएट), 3. सिद्धार्थ जाधव (हजार वेळा शोले पाहिलेला माणूस). 

उत्कष्ट अभिनेत्री : 1. किरण खोजे (तेरवं) 2. वैदही परशुरामी (जग्गु आणि ज्युलिएट) 3. रिंकु राजगुरु (आशा)

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री: 1. निर्मिती सावंत (झिम्मा 2) 2. नम्रता संभेराव (एकदा येऊन तर बघा) 3. तेजस्विनी लोणारी (अफलातून)

उत्कृष्ट विनोदी अभिनेता 1. उपेंद्र लिमये (जग्गु आणि ज्युलिएट) 2. आनंद इंगळे (अलीबाबा चाळीशीतले चोर) 3. गिरिश कुलकर्णी (एकदा येऊन तर बघा)

सहाय्यक अभिनेता : 1. संतोष जुवेकर (रावरंभा) 2. प्रविण डाळिंबकर (घर बंदूक बिर्याणी) 3.सुबोध भावे (अलीबाबा चाळीशीतले चोर)

सहाय्यक अभिनेत्री: 1. उषा नाईक (आशा) 2. अश्विनी महांगडे (महाराष्ट्र शाहीर), सुहास जोशी (झिम्मा 2)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :1. दीपक जोईल (भेरा) 2. शाहू तुकाराम (जिप्सी), 3. जयेश ठक्कर (अफलातून)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :1. गायत्री बनसोडे (जिप्सी) 2. श्रद्धा खानोलकर (भेरा) 3. गौरी देशपांडे (श्यामची आई)

याबरोबरच प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करिता हजार वेळा शोले पाहिलेला माणूस (कौऊस मिडिया एन्टरटेनमेंट), शॉर्ट अॅण्ड स्वीट (शुभम प्रॉडक्शन), जिप्सी (बोलपट निर्मिती) या चित्रपटांना नामांकन मिळाली आहेत. तर प्रथम पदार्पण दिग्दर्शन करिता हरिष इथापे (तेरवं), गजानन पडोल (रौंदळ), आशिष बेंडे (आत्मपॅम्प्लेट) या दिग्दर्शकांना नामांकन प्राप्त झाले आहे.


सम्बन्धित सामग्री