अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. 2025 मधील हा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरत असून, पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा गल्ला पार केला आहे. चित्रपटातील अनेक सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यात विकी कौशलच्या फिटनेसची चर्चा अधिक रंगत आहे. चित्रपटातील एका दृश्यात त्याचे सिक्स पॅक अॅब्स आणि मजबूत शरीरयष्टी पाहून चाहते थक्क झाले आहेत. विकीने ही फिटनेस लेव्हल साधण्यासाठी किती मेहनत घेतली, याविषयी जाणून घेऊया.
जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला, तर विकीने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याच्या जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनच्या मागे नियमित व्यायाम, कठोर वर्कआउट आणि योगाचा मोठा वाटा आहे. तो दररोज जिममध्ये तासंतास घाम गाळतो आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी योगासुद्धा करतो. ‘छावा’साठी त्याने तब्बल काही महिन्यांच्या कठोर मेहनतीनंतर ही दमदार बॉडी तयार केली आहे.
हेही वाचा : “छावा टॅक्स फ्री का नाही? मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट कारण!”
विकीच्या फिटनेस रूटीनमध्ये वेटलिफ्टिंग, पुशअप्स, रोप ट्रेनिंग आणि संपूर्ण शरीराला घडवणाऱ्या व्यायामांचा समावेश आहे. त्याच्या ट्रेनिंगमध्ये विशेषतः बायसेप्स, छाती, अॅब्स आणि स्नायू बळकट करण्यावर भर दिला जातो. त्याला बायसेप्स मजबूत करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला आवडते, ज्यामध्ये पुल-अप्स, मनगट, खांदा आणि बायसेप्ससाठी विविध वर्कआउट्स असतात.
हेही वाचा : Chhaava Box Office Collection : ‘छावा’ची जबरदस्त कमाई! ६ दिवसात बॉक्स ऑफिसवर २०० करोड पार
डाएटबद्दल बोलायचं झाल्यास, विकीला बटाट्याचे पराठे खूप आवडतात, पण बॉडी मेंटेन करण्यासाठी तो काटेकोर आहार घेतो. त्याच्या नाश्त्यात ओट्स, अंडी, भाज्या, डाळ आणि रोटी असते, तर रात्रीच्या जेवणात हलका पण प्रथिनेयुक्त आहार घेतो. त्यात भाज्यांचे सूप, ग्रील्ड चिकन यांचा समावेश असतो.