Saturday, February 08, 2025 03:27:35 PM

ICC Team of the Year
रोहित शर्मा ICC Mens T20 संघाचा कर्णधार

आयसीसीने जाहीर केले '2024 आयसीसी टीम ऑफ द इयर' चे संघ

रोहित शर्मा icc mens t20  संघाचा कर्णधार 

 

मुंबई: आयसीसी ( इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल) ने 2024 मधील खेळाडूंच्या कामगिरीवरून आयसीसी टीम ऑफ द इयर चे संघ जाहीर केले आहेत. या संघात बऱ्याच भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा आणि अर्शदीप सिंगचा यामध्ये समावेश केला गेला आहे. 

जसप्रीत बुमराहची कसोटी आणि टी 20 संघात वर्णी लागली आहे. तो एकटाच भारतीय खेळाडू आहे ज्याची उपस्थिती दोन संघात उपस्तीथी आहे. रोहित शर्मा आणि अर्शदीप सिंग यांना आयसीसी टी 20 संघात स्थान मिळाले आहे. तर, सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला कसोटी संघात स्थान मिळाले आहे. 

आयसीसी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून चरिथ असलंका तर टेस्ट संघाचा कर्णधार म्हणून पॅट कमिन्स याला निवडण्यात आले आहे. आश्चर्यकारक बाब  म्हणजे एकदिवसीय संघात एकही भारतीय खेळाडू नाहीये. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मात्र एकाही संघात स्थान मिळाले नाही. 

आयसीसी पुरुष टेस्ट टीम ऑफ द इयर: यशस्वी जैस्वाल (भारत), बेन डकेट (इंग्लंड), केन विल्यम्सन (न्यूझीलंड), जो रूट (इंग्लंड), हॅरी ब्रुक (इंग्लंड), कामिंदु मेंडिस (श्रीलंका), जेमी स्मिथ (इंग्लंड) (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (भारत), पॅट कॅमिन्स (ऑस्ट्रेलिया) (कॅप्टन), मॅट हेनरी (न्यूझीलंड), जसप्रीत बुमराह (भारत)

आयसीसी पुरुष  वनडे टीम ऑफ द इयर: सैम अय्युब (पाकिस्तान), रहमानुल्ला गुर्बझ (अफगाणिस्तान),पाथुम निसांका (श्रीलंका), कुसल मेंडिस (श्रीलंका) (विकेटकीपर), चारिथ असलांका (श्रीलंका) (कॅप्टन), शेरफेन रदरफोर्ड (वेस्ट इंडिज), अझमतुल्ला ओमरझाई (अफगाणिस्तान), वानिंदु हसरंगा (श्रीलंका), शाहीन शाह आफ्रिदी (पाकिस्तान), हारीस राउफ (पाकिस्तान), ए.एम. घझानफर (अफगाणिस्तान)

ICC पुरुष टी20I टीम ऑफ द इयर: रोहित शर्मा (भारत) (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), फिल सॉल्ट (इंग्लंड), बाबर आजम (पाकिस्तान), निकोलस पूरन (वेस्ट इंडिज) (विकेटकीपर), सिकंदर रझा (झिंबाब्वे), हार्दिक पांड्या (भारत), राशिद खान (अफगाणिस्तान), वानिंदु हसरंगा (श्रीलंका), जसप्रीत बुमराह (भारत), आर्षदीप सिंग (भारत)


सम्बन्धित सामग्री