वाशिंग्टन: केंद्रीय अन्वेषण विभागाने कथित आर्थिक गुन्हेगार मोनिका कपूरला अटक केली असून प्रत्यार्पणानंतर तिला अमेरिकेतून परत आणण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. मोनिका कपूर 25 वर्षांहून अधिक काळ फरार होती. केंद्रीय एजन्सीने कपूरला अमेरिकेत ताब्यात घेतले असून अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाने तिला भारतात आणले जात आहे, जे बुधवारी रात्री भारतात पोहोचू शकते. न्यू यॉर्कच्या पूर्व जिल्ह्यासाठी युनायटेड स्टेट्स जिल्हा न्यायालयाने भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय प्रत्यार्पण करारांतर्गत मोनिका कपूरच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली होती.
मोनिका कपूरचे भारतात प्रत्यार्पण करण्यात येणार -
कथित फसवणुकीनंतर मोनिका कपूर 1999 मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाली. फसवणुकीच्या या प्रकरणात, तिने तिच्या दोन भावांसह दागिन्यांच्या व्यवसायासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. कच्चा माल शुल्कमुक्त आयात करण्यासाठी भारत सरकारकडून परवाने मिळविण्यासाठी या कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. कथित फसवणुकीमुळे भारतीय तिजोरीला 6,79,000 अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले. भारताने ऑक्टोबर 2010 मध्ये दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार कपूरच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेशी संपर्क साधला होता.
हेही वाचा - निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी येमेनमध्ये देण्यात येणार फाशी; केरळमधील नर्सवर काय आरोप आहेत?
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मोनिका कपूरने तिचे भाऊ राजन खन्ना आणि राजीव खन्ना यांच्यासोबत 1998 मध्ये बनावट निर्यात बिले, शिपिंग बिले, इनव्हॉइस, निर्यातीचे बँक प्रमाणपत्र वापरून 2 कोटी 36 लाख रुपयांच्या शुल्कमुक्त सोन्याच्या आयातीसाठी 6 रिप्लेनमेंट (रिप्रेझेंटेशन) परवाने मिळवले आणि नंतर हा परवाना अहमदाबादच्या व्यापारी दीपला नफ्यात विकला. दीपने या परवान्यांचा वापर करून शुल्कमुक्त सोन्याच्या आयातीसाठी सोने आयात केले, ज्यामुळे 1998 मध्ये सरकारला 1.44 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
हेही वाचा - 26/11 Mumbai Attack: तहव्वुर राणाने उघडलं तोंड! पाक सैन्याशी असलेल्या संबंधाचा केला खुलासा
दरम्यान, या प्रकरणात 31 मार्च 2004 रोजी दिल्लीच्या साकेत न्यायालयात मोनिका कपूर, राजन खन्ना, राजीव खन्ना यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 120बी, 420, 467, 468, 471 अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले. तथापि, या काळात मोनिका कपूर तपासात भाग घेत नव्हती, ज्यामुळे 13 डिसेंबर 2016 रोजी न्यायालयाने मोनिकाला पीओ म्हणजेच घोषित गुन्हेगार घोषित केले.