मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी ऑपरेशन सिंदूरशी संबंधित केलेल्या प्रश्नांवरून अडचणीत आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जर राहुल गांधी देशाला समजू शकत नाहीत तर ते परराष्ट्र धोरण कसे समजतील? राहुल गांधींना काहीच समजत नाही. ते अभ्यास करत नाहीत आणि त्यांना शिकण्याची सवयही नाही. जर त्यांना समजत नसेल तर त्यांनी ते शिकले पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांना राहुल गांधींच्या विधानांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधींना काहीही समजत नाही आणि ते अभ्यास करत नाहीत. राहुल गांधींना शिकण्याची सवय नाही, जर त्यांना समजत नसेल तर त्यांनी शिकले पाहिजे. त्याला काय झाले आहे ते मला समजत नाही. जर राहुल गांधी देशाला समजू शकले नाहीत तर त्यांना परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्र मंत्रालय कसे समजेल?
हेही वाचा - मुंबई वाचवायची असेल तर ठाकरे बंधू एकत्र येतील; राऊतांचा स्फोटक दावा
चंद्रशेखर बावनकुळेंनी पुढे म्हटलं आहे की, जर परराष्ट्र मंत्री अपयशी असतील, सरकार अपयशी असेल तर राहुल गांधींनी दरवर्षी दोन महिने परदेशात जाऊन तिथे राहावे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना परराष्ट्र धोरण शिकवत आहे. राहुल गांधींनी दहशतवादाविरुद्ध कसे लढायचे आणि आपले भारतीय सैनिक कसे लढतात हे शिकले पाहिजे. पंतप्रधान मोदी संपूर्ण जगाला सोबत घेऊन जाण्याचे काम करत आहेत, असंही यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - 'आम्ही हस्तक्षेप केला असता पण...' वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात चाकणकरांचा दावा
वेगवेगळ्या पक्षांचे खासदार जगभर फिरून दहशतवाद्यांच्या कारवाया उघड करत आहेत. आम्ही दहशतवादाविरुद्धची लढाई कशी सुरू केली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. राहुल गांधींनीदेखील हे शिकलं पाहिजे, असा सल्लाही यावेळी चंद्रशेअर बावनकुळे यांनी दिला आहे.