Wednesday, June 25, 2025 12:49:34 AM

ज्योती मल्होत्राला हिसार कोर्टाकडून झटका; जामीन अर्ज फेटाळला

हिसार कोर्टाने ज्योती मल्होत्राला जामीन देण्यास नकार दिला आहे. ज्योती मल्होत्र ही हरियाणातील हिसार येथील युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तिच्यावर पाकिस्तानसाठी भारताची हेरगिरी करण्याचा आरोप आहे.

ज्योती मल्होत्राला हिसार कोर्टाकडून झटका जामीन अर्ज फेटाळला
Jyoti Malhotra
Edited Image

हिसार: हेरगिरी प्रकरणात अटक केलेल्या ज्योती मल्होत्राला हिसार कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. ज्योती मल्होत्राचे वकील कुमार मुकेश यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. हिसार कोर्टाने ज्योती मल्होत्राला जामीन देण्यास नकार दिला आहे. ज्योती मल्होत्र ही हरियाणातील हिसार येथील युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तिच्यावर पाकिस्तानसाठी भारताची हेरगिरी करण्याचा आरोप आहे. ज्योती मल्होत्राने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला भारताची संवेदनशील माहिती शेअर केली होती. 

हेही वाचा - राजा रघुवंशी हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट! चारही आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली

प्राप्त माहितीनुसार, 2023 मध्ये, ज्योती पाकिस्तान व्हिसासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशला भेटली. दानिशला भारत सरकारने 13 मे 2025 रोजी हेरगिरीच्या आरोपाखाली हद्दपार केले होते. ज्योतीने दानिश आणि इतर पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी संपर्क केला. ज्योती पाकिस्तानी एजंट्सना गोपनीय माहिती पाठवण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत होती. 

हेही वाचा - 'भारतावर पुन्हा हल्ला झाला तर आम्ही...'; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला कडक इशारा

दरम्यान, ज्योती अनेक वेळा पाकिस्तानला गेली होती, ज्याचे व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर आहेत. पाकिस्तानमध्ये तिला व्हीआयपी वागणूक आणि पोलिस संरक्षण मिळत होते. तिने पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. तसेच ती पाकिस्तानमधील उच्चपदस्थ लोकांना भेटली होती. तथापि, ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात होती.


सम्बन्धित सामग्री