PM Kisan Yojana 20th Installment Date: देशभरातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, बुधवारी कृषी मंत्रालयाने एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली, ज्यामध्ये शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळविण्यासाठी आवश्यक असलेली 6 पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तथापि, सरकारने अद्याप पंतप्रधान किसान योजनेचा 20 वा हप्ता जारी करण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. परंतु लवकरच 20 वा हप्ता जारी होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात होऊ शकते 'इतकी' वाढ
पीएम किसान योजनेचा हप्ता मिळविण्यासाठी 'हे' काम करा -
ई-केवायसी पूर्ण करा:
ई-केवायसीशिवाय कोणताही हप्ता खात्यात हस्तांतरित केला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा.
बँक खात्याशी आधार लिंक करा:
आधार आणि बँक खात्यात काही त्रुटी असल्यास, हप्ता नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे बँक खात्याशी आधार लिंक करून घ्या.
बँक खात्याचे तपशील तपासा:
चुकीच्या आयएफएससी कोड किंवा खाते क्रमांकामुळे पेमेंट अयशस्वी होऊ शकते.
जमिनीचे रेकॉर्ड:
डिजिटल रेकॉर्डमध्ये जमिनीची मालकी स्पष्ट असावी. त्यामुळे जमिनीचे रेकॉर्ड बरोबर आहे का? ते तपासा.
लाभार्थी यादीत नाव तपासा:
pmkisan.gov.in ला भेट द्या आणि तुमचे नाव यादीत आहे की नाही ते पहा.
मोबाइल नंबर अपडेट करा:
नोंदणीकृत मोबाईल नंबर ओटीपी आणि सूचनांसाठी योग्य असावा. तुमचा मोबाइल नंबर अपडेट करा.
हेही वाचा - मालामाल झाले गुंतवणूकदार! मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा 20 रुपयांचा शेअर बनला रॉकेट
पंतप्रधान किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी येईल?
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा 2 हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. हा हप्ता फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर महिन्यात जारी केला जातो. गेल्या वर्षी जूनचा हप्ता महिना संपण्यापूर्वी जारी करण्यात आला होता, परंतु यावेळी 20 वा हप्ता उशिरा येत आहे. विलंबाच्या कारणाबद्दल सरकारने कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. तथापि, सूत्रांचे म्हणणे आहे की पंतप्रधान मोदी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या कार्यक्रमात हा हप्ता जारी करू शकतात. त्याच वेळी, शेवटचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जारी करण्यात आला, ज्यामध्ये 9.8 कोटी शेतकऱ्यांना 22 हजार कोटी रुपये मिळाले.