Saturday, August 16, 2025 08:36:18 PM

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात होऊ शकते 'इतकी' वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याबाबत अनेक अटकळा बांधल्या जात आहेत. सरकार एआयसीपीआयला महागाई भत्ता ठरवण्यासाठी आधार मानते.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर महागाई भत्त्यात होऊ शकते इतकी वाढ

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याबाबत अनेक अटकळा बांधल्या जात आहेत. जुलै 2025 पासून महागाई भत्त्यात 4% वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार एआयसीपीआयला महागाई भत्ता ठरवण्यासाठी आधार मानते. या निर्देशांकाद्वारे बाजारात महागाईची पातळी काय आहे हे समजते. अलिकडच्या काही महिन्यांत, या निर्देशांकात सातत्याने वाढ दिसून आली आहे, जी मार्च 2025 मध्ये 143, एप्रिल 2025 मध्ये 143.5 आणि मे 2025 मध्ये 144 होती. आकडेवारीनुसार, मे महिन्यात 0.5 अंकांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तथापी, जून 2025 मध्ये अशीच वाढ झाली तर डीएमध्ये 4% वाढ जवळजवळ निश्चित आहे.

महागाई भत्त्यात किती वाढू शकते?

सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता मिळत आहे. जर त्यात 4% वाढ झाली तर नवीन महागाई भत्ता 59% होईल. दिवाळीपूर्वी या वाढीमुळे पगार आणि पेन्शनमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने 1 कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा - Gold Rate Today: सोन्याच्या दरात घसरण! खरेदी करण्यापूर्वी चेक करा आजचा दर

दरम्यान, सरकारने अद्याप महागाई भत्त्यात वाढ करण्याबात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार, महागाई भत्त्यात वाढ सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2025 मध्ये जाहीर केली जाऊ शकते. गेल्या वेळेप्रमाणे, ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होऊ शकते. 

हेही वाचा मालामाल झाले गुंतवणूकदार! मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा 20 रुपयांचा शेअर बनला रॉकेट

महागाई भत्त्यात वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा - 

तथापी, महागाई भत्त्यात 4% वाढ झाली तर नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारख्या सणांपूर्वी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल. तसेच बाजारात त्यांची खर्च करण्याची क्षमताही वाढेल. याशिवाय, सरकारने आठव्या वेतन आयोगाला तत्वतः मान्यता दिली आहे. तथापि, अद्याप त्याची समिती स्थापन झालेली नाही. ऑगस्ट 2025 च्या अखेरीस समिती स्थापन होण्याची शक्यता आहे. 
 


सम्बन्धित सामग्री