Sunday, August 03, 2025 10:55:27 PM

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत महत्त्वाची बैठक

आज नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आज एक महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत काय चर्चा झाली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मोठी बातमी पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत महत्त्वाची बैठक
Defence Secretary Rajesh Kumar Singh Meet PM Narendra Modi
Edited Image

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, आज नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आज एक महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत काय चर्चा झाली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी, पंतप्रधान मोदी रविवारी हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांची भेट घेतली होती, तर शनिवारी अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी त्यांना भेटण्यासाठी आले होते.

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी 26 एप्रिल रोजी पहिली सीसीएस बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. यानंतर, 30 एप्रिल रोजी पंतप्रधानांनी लष्कर उपेंद्र द्विवेदी यांच्याशी बैठक घेतली. यावेळी परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील उपस्थित होते. भारताच्या प्रत्युत्तराची वेळ, पद्धत आणि लक्ष्य हे सैन्य स्वतः ठरवेल असे स्पष्ट निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत.

दरम्यान, हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान दररोज युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानच्या या नापाक कृत्याला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तान दररोज युद्धाच्या धमक्या देत आहे. तथापि, पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी, संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ, परराष्ट्र मंत्री आणि अनेक राजदूतांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे.

हेही वाचा - पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पाकिस्तान तरसणार! आता चिनाब नदीवरील सलाल धरणाचे सर्व दरवाजे बंद 

पाकिस्तानच्या घशाला कोरड -  
 
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारत सिंधू आणि तिच्या उपनद्यांचे पाणी अडवत आहे. आज भारताने चिनाब नदीवर बांधलेल्या सालार धरणाचे पाणीही थांबवले. अशा परिस्थितीत चिनाब नदीचा पाकिस्तानकडे जाणारा प्रवाह थांबला आहे. याआधी भारताने सिंधू नदीचा प्रवाह रोखला आहे. तथापि, भारत आता किशनगंगा प्रकल्पाद्वारे झेलम नदीचे पाणीही रोखण्याची तयारी करत असल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये येत आहेत. 

हेही वाचा - पाकिस्तानकडून LOC वर पुन्हा गोळीबार; सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन

याशिवाय, भारताने कोणत्याही तिसऱ्या देशामार्फत पाकिस्तानशी होणारा व्यापार थांबवला आहे. याशिवाय, भारताने पाकिस्तानी जहाजांसाठी आपली बंदरे बंद केली आहेत. तसेच पोस्टल आणि पार्सल सेवा आणि हवाई मार्ग देखील बंद करण्यात आला आहे.
 


सम्बन्धित सामग्री