Raja Raghuvanshi Murder Case
Edited Image
इंदूर: गेल्या आठवडाभरापासून देशभरात राजा रघुवंशी हत्याकांड चर्चेचा विषय ठरलं आहे. कारण, राजाची पत्नी सोनमनेचं त्याची हत्या केल्याचं खळबळजनक सत्य आता सर्वांसमोर आलं आहे. सोनमने इंदूरच्या वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्येची योजना आखली होती. राज कुशवाहा आणि इतर तिघांनी तिला ही योजना राबवण्यास मदत केली. आता पाचही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. हत्येचे सूत्रधार राज आणि सोनम आहेत. इतर तीन आरोपी कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत, ज्यांना राजाला मारण्यासाठी 20 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. राजाला शिलाँगला हनिमूनसाठी आणण्यापासून ते आरोपीच्या हत्येनंतर पळून जाण्यापर्यंतचे संपूर्ण नियोजन सोनमने केले होते.
शिलाँग पोलिसांनी आतापर्यंत जोडलेल्या सर्व लिंक्स सोनमच सूत्रधार असल्याचे दर्शवितात, पण सोनमने राजाला का मारले? लग्नाच्या 10 दिवसांत तिने तिच्या पतीची हत्या का केली असावी ? मेघालय पोलिस विभागाच्या एसआयटीला सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहासह पाच आरोपींकडून 10 हून अधिक प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. बुधवारी त्यांना 8 दिवसांच्या रिमांडवर घेतल्यानंतर, मेघालय पोलिसांच्या एसआयटीने सोनम आणि राज यांची 4 तास समोरासमोर चौकशी केली.
हेही वाचा - राजा रघुवंशी हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा! सोनमने स्वतः दरीत फेकला होता पतीचा मृतदेह
पोलिस सोनमला 'हे' प्रश्न विचारून करणार राजा रघुवंशी हत्याकांडाचा खुलासा -
लग्नाच्या 10 दिवसांनंतर पती राजाला का मारले?
प्रेमप्रकरण हे राजाच्या हत्येचे कारण होते की आणखी काही प्रकरण आहे?
तुम्ही तुमच्या पती राजाला मारण्यासाठी मेघालय आणि शिलाँगची निवड का केली?
तुम्ही हत्यार कुठून खरेदी केले? पुरावे मिटवले गेले का?
संपूर्ण हत्येचा कट कोणी रचला आणि राजने त्यात कोणती भूमिका बजावली?
आकाश राजपूत, विशाल सिंग चौहान आणि आनंद कुर्मी यांनी हत्येत कोणती भूमिका बजावली?
तुम्ही 17 दिवस कुठे होता? तुम्ही तुमच्या आई आणि भावाशी संपर्क का साधला नाही?
तुम्ही अचानक गाजीपूरला येऊन तुमच्या भावाला का फोन केला? तुमच्या आत्मसमर्पणाचे खरे सत्य काय आहे?
जर तु राज कुशवाहावर प्रेम करत होती तर तु राजाशी लग्न का केले?
तिच्या पालकांना राज कुशवाहासोबतच्या तिच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती होती का?
हेही वाचा - राजा रघुवंशी हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट! चारही आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
खरंतर अगदी सर्वसामान्य लोकांना पण वरील प्रश्न पडले आहेत. सोनम जर राज कुशवाहावर प्रेम करत होती तर तिने राजा रघुवंशीसोबत लग्न का केलं. जरी कोणत्या दबावाखाली तिने राजाशी लग्न केलं असलं तरी तिने राजाला घटस्फोट द्यायचा होता. मात्र, सोनमने राजाला घटस्फोट न देता हत्या हा मार्ग का निवडला असेल? असे अनेक प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र, लवकरचं पोलिस या सर्व प्रश्नांचा उलगडा करणार आहेत.