Sunday, August 17, 2025 05:14:59 PM

'जनशक्ती सर्वोच्च आहे!' विकास जिंकला, सुशासन जिंकले! दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'जनशक्ती सर्वोच्च आहे!' विकास जिंकला, सुशासन जिंकले!

जनशक्ती सर्वोच्च आहे विकास जिंकला सुशासन जिंकले दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
PM Modi first reaction On BJP's victory
Edited Image

Delhi Election Result 2025: दिल्लीतील भाजपच्या प्रचंड विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'जनशक्ती सर्वोच्च आहे!' विकास जिंकला, सुशासन जिंकले! दिल्लीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि तेथील लोकांचे जीवन चांगले करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, याची हमी सरकार देईल. यासोबतच, विकसित भारताच्या उभारणीत दिल्ली महत्त्वाची भूमिका बजावेल याचीही आम्ही खात्री देतो. या प्रचंड जनादेशासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या @BJP4India च्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा मला खूप अभिमान आहे. आता आम्ही दिल्लीतील लोकांची सेवा करण्यासाठी अधिक दृढपणे समर्पित राहू, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. 

हेही वाचा -  Delhi Election Result : 'आप'चं गणित कुठे चुकलं की काय? काय असू शकतात मागे पडण्याची कारणं?

'दिल्ली आता 'आप'मुक्त झाली' - जेपी नड्डा

दरम्यान, भाजप नेते जेपी नड्डा यांनी यांनी देखील आपली प्रतिक्रिया अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून व्यक्त केली आहे. जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे की, 'आप-दा' मुक्त दिल्ली! आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सेवा, सुशासन, गरीब कल्याण, अंत्योदय आणि विकासाच्या धोरणांवर जनतेच्या अढळ पाठिंब्याचा विजय आहे. मी प्रत्येक बूथवर अथक परिश्रम करणाऱ्या आमच्या भाजप कार्यकर्त्यांचे आणि राज्य नेतृत्वाचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. 'आप-दा' सरकारने दिल्लीत भ्रष्टाचार, कुशासन आणि तुष्टीकरणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.'

हेही वाचा - जेलची हवा खाणाऱ्या दिल्लीतील 'त्या' उमेदवारांची काय आहे स्थिती? जनतेने नाकारलं की, स्विकारलं? जाणून घ्या
 

27 वर्षांनंतर दिल्लीत भाजप सरकार स्थापन करणार - 

भाजप तब्बल 27 वर्षांनी दिल्लीत पुन्हा सत्तेत येणार आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा देखील भाजप उमेदवारांकडून पराभव झाला आहे. तसेच आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय, सौरभ भारद्वाज यांच्यासह सत्ताधारी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.
 


सम्बन्धित सामग्री