Monday, February 17, 2025 01:02:27 PM

Tahavur will bring Rana to India
तहव्वूर राणाला भारतात आणणार

मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणले जाणार आहे.

तहव्वूर राणाला भारतात आणणार

मुंबई : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणले जाणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात त्याने प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध केलेले अपील  फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

कोण आहे मुख्य आरोपी राणा?

26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता.  राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाचा सदस्य आहे. तहव्वूर राणा व डेव्हिड हेडलीने मुंबई हल्ल्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली होती. मुंबईत झालेल्या हल्ल्त्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता तर 300 जण जखमी झाले होते. मृतांमध्ये काही अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता. यावेळी पोलीस आणि लष्कराने  9 दहशतवाद्यांना ठार केले होते. मुंबई पोलिसांनी एकमात्र दहशतवादी अजमल कसाबला अटक करण्यात यश मिळवलं होतं. अजमल कसाबला 2012 मध्ये फाशी देण्यात आली.

हेही वाचा : सरकारी नोंदींप्रमाणे मराठ्यांना कुणबी आरक्षण द्या; जरांगेंची मागणी

याप्रकरणी सरकारने आपली बाजू भक्कमपणे मांडलीय. सरकार स्ट्रॉंग असल्याने देशासोबत गद्गदारी करण्याची यापुढे हिम्मत होणार नाही. विरोधकांनी मात्र याप्रकरणी समाधान व्यक्त करण्याऐवजी त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. देशाबाहेर ऐक आरोपी मोकाट फिरत आहेत, त्यांनाही अटक करण्याची मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.  पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा उद्योगपती तहव्वूर राणा याच्या  प्रत्यार्पणानंतर या हल्लातील आणखीन माहिती यंत्रणांना मिळण्याची शक्यता आहे. भारत सरकारने याबाबत योग्य पाठपुरावा केल्यामुळे हे शक्य झालं आहे.

 


सम्बन्धित सामग्री