भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात तो प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आरजे महवश सोबत दिसला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबईत रंगलेल्या या सामन्यात चहलला महवशसोबत पाहून चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली.
सध्या चहल त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कठीण काळातून जात आहे, कारण त्याचा आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट सुरू आहे. त्यामुळेच महवशसोबत त्याच्या उपस्थितीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
आरजे महवश ही अलिगढ येथे जन्मलेली एक प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती तिच्या मजेदार प्रँक व्हिडिओंमुळे ओळखली जाते. शिक्षणाच्या बाबतीत, तिने अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी मधून पदवी घेतली असून जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली येथून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
महवश केवळ एक यूट्यूबरच नाही, तर ती लोकप्रिय रेडिओ जॉकी देखील आहे. तिने रेडिओ मिर्ची 98.3 FM वर आपल्या करिअरची सुरुवात केली. ती केवळ मनोरंजनच करत नाही तर आपल्या व्हिडिओंमधून महिलांना प्रेरित करण्याचं कामही करते.महवशला बिग बॉस 14 आणि काही बॉलिवूड प्रोजेक्ट्स साठी ऑफर मिळाल्या होत्या. मात्र, तिने सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्या ऑफर नाकारल्या.
महवशने गेल्या डिसेंबर महिन्यात चहलसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर या दोघांच्या नात्याबद्दल चर्चांना उधाण आलं. मात्र, यावर महवशने स्पष्टीकरण देत या अफवा निराधार असल्याचं सांगितलं. तिने चाहत्यांना खोट्या बातम्या पसरवू नका आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करा, अशी विनंती केली. यावर चहलनेही सामोरे येत चाहत्यांना विनंती केली की, अशा अफवांमध्ये गुंतू नका, कारण यामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
वैयक्तिक आयुष्यातील चर्चांव्यतिरिक्त चहल आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना दिसणार आहे. 2024 च्या मेगा ऑक्शनमध्ये PBKS ने त्याला तब्बल 18 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतलं.आता चहल आणि महवश यांच्यात खरंच काही आहे का, की फक्त मैत्री आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.