Sunday, August 17, 2025 05:14:38 PM

होळीपूर्वी महायुती सरकारचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट! महागाई भत्त्यात 12 टक्के वाढ

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट 12 टक्के वाढ केली आहे. मंगळवारी जारी केलेल्या आदेशानुसार, पाचव्या वेतन आयोगाने ठरवलेल्या वेतनश्रेणीअंतर्गत ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू होईल.

होळीपूर्वी महायुती सरकारचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट महागाई भत्त्यात 12 टक्के वाढ
Dearness Allowance
Edited Image

Dearness Allowance: फडणवीस सरकारने होळीच्या आधीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट 12 टक्के वाढ केली आहे. मंगळवारी जारी केलेल्या आदेशानुसार, पाचव्या वेतन आयोगाने ठरवलेल्या वेतनश्रेणीअंतर्गत ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू होईल. या नवीन वाढीनंतर, महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 455 टक्के झाला आहे, जो पूर्वी 443 टक्के होता. कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी 2025 मध्ये मिळालेल्या पगारासह या वाढीव डीएचा लाभ दिला जाईल. त्याची गणना जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत केली जाईल.

हेही वाचा - संतोष देशमुख हत्याप्रकरणी अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘ही’ मागणी मान्य; देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

किती कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ?

या वाढीचा फायदा राज्यातील 17 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना होईल. सरकारने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, राज्य सरकारने करावयाचा हा खर्च अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांसाठी वाटप केलेल्या तरतुदींमधून केला जाईल. यासोबतच, महागाई भत्त्याच्या तपशीलांमधील तरतुदी आणि विद्यमान प्रक्रिया भविष्यातही लागू राहतील, असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - अंबादास दानवे यांनी घेतले महादेवाचे दर्शन, राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना

झारखंड सरकारनेही वाढवला राज्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता - 

दरम्यान महाराष्ट्र सरकारपूर्वी झारखंड सरकारनेही महागाई भत्ता वाढवला आहे. 18 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 टक्के वाढ केली. हा आदेश 1 जुलैपासून लागू होईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांना 239 टक्क्यांऐवजी 246 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाईल. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली.


सम्बन्धित सामग्री