Thursday, July 31, 2025 05:08:23 AM

अंबादास दानवे यांनी घेतले महादेवाचे दर्शन, राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना

राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या पवित्र दिवशी घृष्णेश्वर मंदिरात जाऊन भोलेनाथाचे दर्शन घेतले.

अंबादास दानवे यांनी घेतले महादेवाचे दर्शन राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना

देशभरात आज महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. भगवान शंकराच्या दर्शनासाठी शिवभक्तांची मंदिरांमध्ये अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बारावा ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर या दिवशी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या पवित्र दिवशी घृष्णेश्वर मंदिरात जाऊन भोलेनाथाचे दर्शन घेतले. भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होत राज्याच्या जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना त्यांनी केली.

मंदिर परिसरात भजन, कीर्तन, महाआरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांच्या “हर हर महादेव” च्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे.

'>http://


सम्बन्धित सामग्री






Live TV