Thursday, July 17, 2025 01:12:18 PM

नवाब मलिकांना राष्ट्रवादीचा एबी फॉर्म ?

नवाब मलिक यांना अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी एबी फॉर्म दिल्याचे सूत्रांकडून समजते.

नवाब मलिकांना राष्ट्रवादीचा एबी फॉर्म

मुंबई : नवाब मलिक यांना अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी एबी फॉर्म दिल्याचे सूत्रांकडून समजते. या वृत्ताला पक्षाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित आरोपीशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप नवाब मलिकांवर आहे. या प्रकरणात न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. यामुळे नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ नये अशी ठाम भूमिका भाजपाने घेतली होती. विरोध असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली तर नवाब मलिक प्रकरणी महायुतीतले इतर पक्ष काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

नवाब मलिक यांची मुलगी सना मलिकला राष्ट्रवादी काँग्रेसने अणुशक्तीनगरमधून उमेदवारी दिली आहे. सना मलिक यांनी उमेदवारी अर्ज भरला असताना नवाब मलिक यांनीही राष्ट्रवादीचा एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरला तर या काय होणार यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 


सम्बन्धित सामग्री