मुंबई : यूट्यूबवरील व्हिडिओजमध्ये शॉर्ट व्हिडिओज खूप वेगाने लोकप्रिय झाले आहेत. शॉर्ट व्हिडिओजमधील कंटेंट खूप कमी वेळात प्रभावीपणे समजतो. यामुळे मोठा व्हिडिओ पाहायला वेळ नसेल तरी, काम चालून जाते. तसेच, कमी वेळात अनेक शॉर्टस पाहिल्यामुळे अनेक गोष्टींमधली माहिती कमी वेळात मिळते. शॉर्टसच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा सध्या यूट्यूबचा विचार आहे. यासाठी शॉर्टस वापर वाढण्यासाठी आणि हे व्हिडिओ बनवण्यात सुलभता येण्यासाठी YouTube ने खास YouTube Shorts साठी अनेक नवीन AI-बेस्ड फीचर्स लाँच करण्याची अधिकृतपणे घोषणा केली आहे. यामुळे 2025 मध्ये, YouTube त्यांच्या शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ प्लॅटफॉर्म YouTube Shorts ला एक नवीन दिशा देणार आहे.
या नवीन AI-बेस्ड फीचर्समुळे आता क्रिएटर्सना एडिटिंग सॉफ्टवेअरची आवश्यकता राहणार नाही. नवीन एआय टूल्ससह व्हिडिओ एडिटिंग सोपे झाले आहे. व्हिडिओ मेकिंग इतकी सोपी आणि जलद करणे हा त्यांचा उद्देश आहे की कोणीही - नवशिक्यापासून ते व्यावसायिक निर्मात्यापर्यंत - कोणत्याही तांत्रिक कौशल्याशिवाय देखील उत्तम कंटेंट तयार करू शकेल. याबाबत कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे. लवकरच YouTube शॉर्ट्ससाठी अनेक नवीन AI-बेस्ड फीचर्स लाँच केले जाणार आहेत. 2025 मध्ये YouTube हळूहळू ही सर्व AI फीचर्स लाँच करेल. अपडेट्स टप्प्याटप्प्याने यूझर्सपर्यंत पोहोचतील.
हेही वाचा - अमेरिकन विमानतळावर भारतीय महिलेला 8 तास ताब्यात ठेवलं; उबदार कपडे काढायला लावून पुरुष अधिकाऱ्यांकडून तपासणी
आता यूट्यूबवर अपलोड करण्यासाठी व्हिडिओ बनवणाऱ्यांना एडिटिंग सॉफ्टवेअरची आवश्यकता राहणार नाही. नवीन एआय टूल्ससह व्हिडिओ एडिटिंग सोपे झाले आहे. खाली दिलेल्या AI एडिटिंग टूल्समुळे पोस्ट-प्रॉडक्शन सोपे होईल.
- ऑटोमॅटिक सीन डिटेक्शन
- स्मार्ट ट्रान्झिशन
- वन-टॅप बॅकग्राउंड रिमूव्हल
AI ने तयार होईल शॉर्ट्सची स्क्रिप्ट
चांगली आयडिया असणे ही एक गोष्ट आहे, परंतु ती स्क्रिप्टमध्ये रूपांतरित करणे कठीण असू शकते. आता YouTube देखील यामध्ये मदत करेल. एआय आधारित स्क्रिप्ट जनरेटरकडून व्हिडिओ क्रिएटर्सना काय काय मिळेल, जाणून घेऊ..
- त्वरित स्क्रिप्ट आयडियाज मिळतील
- ट्रेंडिंग हुकसाठी सूचना मिळतील
- प्लॅनिंगमुळे प्रोडक्शनचा वेळ वाचेल
AI पॉवर्ड व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अॅनिमेशनमुळे शॉर्ट्सना एक सिनेमॅटिक टच मिळेल.
आता तुम्ही हे करू शकता:
- मोशन ग्राफिक्स जोडू शकतो
- क्रिएटिव्ह ट्रांझिशन टाकू शकता.
- स्टोरीटेलिंग अधिक मनोरंजक बनवू शकते
AIने बनवलेले सबटायटल्स आणि ट्रान्शलेशन, आता कंटेंट जगभरात पोहोचेल. YouTube शॉर्ट्समध्ये आता एआय-जनरेटेड सबटायटल्स आणि बहु-भाषिक भाषांतरे देखील असतील.
यामुळे काय होईल..
- वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हिडिओ सबटायटल्स
- कंटेंट जगभरात पोहोचणे सोपे होईल
- श्रवणदोष असलेल्या लोकांसाठी सुधारित अनुभव
हेही वाचा - नवीन टॅरिफ मागे घ्या...! एलोन मस्क यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन
YouTube ने प्रत्येकाला क्रिएटर बनवणे हे आपले ध्येय असल्याचे म्हटले आहे. कंटेंट निर्मिती सोपी आणि सर्वांना उपलब्ध व्हावी यासाठी ही सर्व फीचर्स सादर केली जात असल्याचे युट्यूबचे म्हणणे आहे. तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल किंवा आधीच प्रसिद्ध असाल, तरीही ही टूल्स तुमच्यासाठी समानपणे उपयुक्त आहेत. तेव्हा YouTube ने आपल्या वापरकर्त्यांना सांगितले आहे की,
- कंटेंटवर फोकस करा, टेक्निकल एडिटिंगवर नाही
- कमी वेळेत उच्च दर्जाचे व्हिडिओ तयार करा
- जगभरातील अधिक लोकांशी कनेक्ट व्हा