नवी दिल्ली : काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे आहेत ? असा प्रश्न अमित शाह यांनी ट्वीट करून राहुल गांधींना विचारला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल यांना दहा प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्याकडून अद्याप आलेली नाहीत.
काँग्रेसनं 'नॅशनल कॉन्फरन्स' सोबत निवडणुकीसाठी युती केली आहे. त्यानिमित्तानं 'नॅशनल कॉन्फरन्स'च्या जाहीरनाम्याच्या आधारे अमित शाह यांनी काय केले आहेत सवाल पाहुयात.
१. 'नॅशनल कॉन्फरन्स'ला जम्मू-काश्मीरात 'वेगळा ध्वज' फडकवायचाय. याला काँग्रेसचा पाठिंबा आहे ?
२. काँग्रेसला अनुच्छेद ३७० आणि ३५(अ) पुन्हा लागू करायचे आहेत ?
३. काँग्रेस काश्मिरी युवकांचे भवितव्य पाकिस्तानच्या हाती देऊ इच्छिते ?
४. पाकिस्तानसोबत व्यापाराआडून काँग्रेसला दहशतवादाला प्रोत्साहन द्यायचे आहे ?
५. काँग्रेस अतिरेकी कारवायांमधल्या तरुणांना प्रोत्साहन देऊ इच्छिते
६. जम्मू-काश्मीरात काँग्रेसला दलितांचे आरक्षण संपवायचे आहे ?
७. शंकराचार्य पर्वत आणि हरी पर्वताची ओळख इस्लामी व्हावी अशी काँग्रेसची इच्छा आहे ?
८. जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला भ्रष्टाचाराच्या विळख्यात काँग्रेस ढकलू इच्छिते ?
९. 'नॅशनल कॉन्फरन्स'च्या जम्मू आणि काश्मीरातील फुटीरतावादी राजकारणाला काँग्रेस समर्थन देते ?
१०. काँग्रेस काश्मीरला भारतापासून वेगळं करु इच्छिते ?