Sunday, August 17, 2025 04:07:43 PM

IPL 2025 सुरू करण्यासाठी BCCI चा मास्टर प्लॅन तयार! अंतिम सामन्याच्या तारीखबाबत मोठी अपडेट

बोर्डाने सर्वांना तोंडी सांगितले आहे की, ते लवकरच नवीन वेळापत्रक बनवून आयपीएल पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहेत. बीसीसीआयने अद्याप काहीही सांगितले नसले तरी त्यांनी तयारी सुरू केली आहे.

ipl 2025 सुरू करण्यासाठी bcci चा मास्टर प्लॅन तयार अंतिम सामन्याच्या तारीखबाबत मोठी अपडेट
IPL 2025
Edited Image

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या काळात क्रिकेट पुन्हा एकदा पुनरागमन करत असल्याचे दिसून येत आहे. जगातील सर्वात मोठी लीग म्हणजेच आयपीएल मध्यंतरीच थांबवण्यात आली होती, पण आता ती पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने अद्याप काहीही सांगितले नसले तरी त्यांनी तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयने रविवारी पंजाब किंग्ज वगळता सर्व आयपीएल संघांना मंगळवारपर्यंत आपापल्या ठिकाणी रिपोर्ट करण्यास सांगितले. बोर्डाने सर्वांना तोंडी सांगितले आहे की, ते लवकरच नवीन वेळापत्रक बनवून आयपीएल पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहेत. तथापि, बीसीसीआयने फ्रँचायझींना त्यांच्या परदेशी खेळाडूंना त्यांच्या प्रवासाच्या योजनांबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे.

परदेशी खेळाडू लवकरच परतू शकतात - 

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यानंतर, आयपीएल सामने अचानक थांबवण्यात आले. आता दोन्ही देशांमधील युद्ध थांबले आहे. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींना आयपीएल सामन्याबाबत एक नवीन आशा निर्माण झाली आहे. बीसीसीआय लवकरच पुन्हा आयपीएल सामने सुरू करू शकते, असं सांगण्यात येत आहे. बीसीसीआयने सर्व दहा संघांना सांगितले आहे की त्यांनी त्यांच्या घरी गेलेल्या परदेशी खेळाडूंना लवकरात लवकर परत बोलावावे, जेणेकरून आयपीएल पुन्हा सुरू करता येईल.

हेही वाचा - भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! दीपिका कुमारीने शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकले कांस्यपदक

IPL चा अंतिम सामना 25 मे रोजी होणार?   

बीसीसीआय आयपीएल लवकरात लवकर सुरू करण्याचा आणि नियोजित कार्यक्रमानुसार 25 मे रोजी अंतिम करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे जर आयपीएल सुरू झाले तर डबल हेडर सामने होतील, जेणेकरून एकाच दिवशी दोन सामने खेळता येतील. तथापि, सामन्यांवर परिणाम होऊ नये आणि संघांना जास्त प्रवास करावा लागू नये म्हणून उर्वरीत सामने बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद ठिकाणी खेळले जाऊ शकतात. 

हेही वाचा - भारत-पाक युद्धबंदीनंतर IPL 2025 कधी सुरु होणार? मोठी अपडेट आली समोर

आम्ही सरकारकडून परवानगी घेऊ - साकिया

आयपीएल पुन्हा सुरू करण्याबाबत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, नवीन वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी ते सरकारची परवानगी घेतील. त्यांनी सांगितले की, 'सध्या आयपीएलचे महत्त्व पाहता, ते पुन्हा सुरू करण्याची वेळ निश्चित करण्यापूर्वी भारत सरकारची परवानगी घेणे देखील आवश्यक असेल. संपूर्ण प्रक्रिया वेळेवर पूर्ण झाल्यानंतर बीसीसीआय लवकरच आयपीएल पुन्हा सुरू करण्याची तारीख जाहीर करेल.'   


सम्बन्धित सामग्री