Sunday, August 17, 2025 05:12:17 PM

बावनकुळेंनी उद्धवना सुनावले

महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिउबाठाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव यांना सुनावले

बावनकुळेंनी उद्धवना सुनावले

नागपूर : महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिउबाठाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव यांना सुनावले. दिशाभूल करू नका.... हिंगणघाटमध्ये भर रस्त्यात तरुण प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळले होते तेव्हा उद्धवच मुख्यमंत्री होते. डोंबिवलीच्या भोपरमध्ये १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. ३३ आरोपींची नावं समोर आली होती. तेव्हा पण उद्धवच मुख्यमंत्री होते. मुंबईतील साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. येथील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला होता. तेव्हा पण उद्धवच मुख्यमंत्री होते. या सर्वच घटनांचा भाजपा निषेध करते. आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी सध्याचे राज्य शासन प्रयत्न करत आहे. उद्धव यांचे उठता बसता राजकारण करत आहेत; असे बावनकुळे म्हणाले.


सम्बन्धित सामग्री