Sunday, July 13, 2025 06:56:57 PM

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर

नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नाशिकमध्ये विविध विकासकामांचं भूमिपूजन होणार आहे. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ याप्रसंगी उपस्थित असतील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसाठी हा नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बसवलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती ब्रॉंझ धातूच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचेही लोकार्पण होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री