Friday, December 13, 2024 12:30:21 PM

Devendra Fadnavis
फडणवीसांचे गडकरींच्या घरी औक्षण

देवेंद्र फडणवीस यांचे शुक्रवारी नितीन गडकरींच्या घरी औक्षण झाले. गडकरींच्या पत्नीने फडणवीसांचे औक्षण केले.

फडणवीसांचे गडकरींच्या घरी औक्षण

नागपूर : देवेंद्र फडणवीस यांचे शुक्रवारी नितीन गडकरींच्या घरी औक्षण झाले. गडकरींच्या पत्नीने फडणवीसांचे औक्षण केले. याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरी त्यांचे औक्षण झाले. आई, पत्नी आणि मुलगी यांनी फडणवीसांचे औक्षण केले. घरी आणि गडकरींच्या घरी औक्षण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. 

देवेंद्र फडणवीस नैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. फडणवीस आतापर्यंत सलग पाच वेळा विधानसभेची निवडणूक जिंकले आहे. यावेळी ते सहाव्यांदा आमदारकीची निवडणूक लढवत आहेत. 

आमदारकीसाठी फडणवीसांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना केले. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo