FIDE Women's World Cup 2025: भारताच्या दिव्या देशमुख हिने 2025 च्या FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दिव्याने दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पीचा पराभव केला. टायब्रेकरमध्ये झालेल्या या रोमांचक लढतीत दिव्याने 2.5-1.5 असा विजय मिळवत भारतासाठी हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला. ही स्पर्धा जिंकून दिव्या देशमुख भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर बनली आहे. याआधी हम्पी, डी. हरिका आणि आर. वैशाली या तिघींसोबत आता दिव्याचे नावही बुद्धिबळ इतिहासात कोरले गेले आहे. या कामगिरीमुळे दिव्या देशमुख FIDE महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.
हेही वाचा - दिव्या देशमुख आणि कोनेरु हम्पीमध्ये होणार अंतिम लढत
विजयानंतर भावूक झालेल्या दिव्याने सांगितले, 'विजय समजून घेण्यासाठी मला थोडा वेळ लागेल. स्पर्धेपूर्वी माझ्याकडे एकही नॉर्म नव्हता आणि आता मी ग्रँडमास्टर आहे, हे खरंच माझ नशिब आहे.' तथापी, ही कामगिरी करत दिव्याने पुढील वर्षी होणाऱ्या महिला कॅंडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. ही स्पर्धा चीनच्या विद्यमान विश्वविजेत्या जू वेनजुनविरुद्ध होणाऱ्या विश्वचषक सामन्यासाठी अंतिम दावेदार ठरवेल.
हेही वाचा - जगप्रसिद्ध रेसलर हल्क होगन काळाच्या पडद्याआड; वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दिव्या देशमुख बनली भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर -
अलिकडच्या काळात पुरुष बुद्धिबळात खूप यश मिळाले आहे, ज्यामध्ये विश्वविजेता डी गुकेश, आर प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगेसी सारख्या खेळाडूंनी सातत्याने मोठे यश मिळवले आहे. दिव्या आता देशातील महिला ग्रँडमास्टरच्या यादीत हम्पी, डी हरिका आणि आर वैशाली यांच्यात सामील झाली आहे. दिव्या देशमुखच्या या यशामुळे भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रात नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. तिचा हा विजय महिला बुद्धिबळासाठी एक नवा टप्पा मानला जात आहे.