Friday, July 25, 2025 08:42:35 PM

जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही चकमक सुरूच; जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील नादेर, त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. गुरुवारी सकाळपासून सुरु झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही चकमक सुरूच जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 नागरिकांची हत्या केली. या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांची 11  तळे उद्धवस्त केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. परंतु आता भारतीय लष्कराने देशात असलेल्या विशेषत: जम्मू आणि काश्मीरच्या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. नुकतच जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील नादेर, त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. गुरुवारी सकाळपासून सुरु झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत. 

जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही चकमक सुरूच आहे. गेल्या 5 तासांपासून त्रालमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. आसिफ शेख, अहमद भट, आमिर वाणी अशी दहशतवाद्यांची नावं आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, संशयास्पद हालचालींबद्दल विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर कडक बंदोबस्त सुरू करण्यात आला. शोधमोहीम सुरू असताना सुरक्षा दलांवर जोरदार गोळीबार झाला आणि जोरदार गोळीबार सुरू आहे असे अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढा घातला आहे आणि अधिक जवानांना पाठवण्यात आले आहे. 

हेही वाचा : भिकेला लागलेल्या पाकची दहशतवाद्यांना मात्र खैरात; IMFच्या निधीचा दुरुपयोग सुरुच

गेल्या तीन दिवसात जम्मू काश्मीरमध्ये ही दुसरी चकमक झाली आहे. याआधी 13 मे रोजी शोपियान जिल्ह्यातील केलर येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. बुधवारी केलरमधूनच शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. 


सम्बन्धित सामग्री