Saturday, August 16, 2025 08:38:36 PM

IT कंपनी Intel चा मोठा निर्णय! 25 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

इंटेलच्या कर्मचाऱ्यांची संख्या सध्या जवळपास 1,08,900 आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे ही संख्या आता 75 हजार पर्यंत खाली येणार आहे.

it कंपनी intel चा मोठा निर्णय 25 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
Intel layoffs
Edited Image

Intel Layoffs: संगणक चिप्स बनवणाऱ्या जगातील आघाडीच्या आयटी कंपनी इंटेलने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने 2025 च्या अखेरीस तब्बल 25 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी केली आहे. यामुळे जागतिक आयटी क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे. इंटेलच्या कर्मचाऱ्यांची संख्या सध्या जवळपास 1,08,900 आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे ही संख्या आता 75 हजार पर्यंत खाली येणार आहे. या निर्णयाचा उद्देश कंपनीला आर्थिकदृष्ट्या बळकट करणे आणि खर्च कमी करणे आहे.

इंटेलचे CEO लिप-बू टॅन यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना पत्र लिहून सांगितले की, 'कठीण काळातून जात असताना कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि जबाबदारी वाटण्यासाठी कठोर पण गरजेचे निर्णय घ्यावे लागत आहेत.' यापूर्वी, इंटेलने एप्रिल 2025 मध्ये कंपनीच्या खर्चात कपात करण्याचे संकेतही दिले होते. तसेच 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याचं म्हटलं होतं. 

हेही वाचा -  Google Layoffs: गुगलचा पुन्हा शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ! ''या'' कारणामुळे केली कर्मचारी कपात

प्राप्त माहितीनुसार, कंपनीला दुसऱ्या तिमाहीत 2.9 अब्ज डॉलर्सचा निव्वळ तोटा सहन करावा लागला. कंपनीचा महसूल 12.9 अब्ज डॉलर्सवर स्थिर राहिला. तसेच पुढील तिमाहीसाठी हा अंदाज 12.6 ते 13.6 अब्ज डॉलर्स इतका वर्तवण्यात येत आहे. यासोबतच, जर्मनी आणि पोलंडमधील नवीन कारखान्यांची योजना स्थगित करण्यात आली आहे.

हेही वाचा -  Amazon Layoffs: अमेझॉनचा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! 14000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

इंटेलसह अनेक टेक कंपन्या जागतिक मंदी, सप्लाय चेन अडचणी आणि AI क्षेत्रातील बदलत्या प्राथमिकता यामुळे अडचणीत आहेत. या कपातीचा प्रभाव जगभरातील कामगारांवर पडण्याची शक्यता आहे.
 


सम्बन्धित सामग्री