Sunday, August 17, 2025 05:56:13 AM

वाळूज एमआयडीसीत उद्योजकाला मारहाण

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये एका उद्योजकास कंपनीतून काढून टाकलेल्या कामगाराने साथीदारांच्या मदतीने लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घडली आहे.

वाळूज एमआयडीसीत उद्योजकाला मारहाण
crime

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये एका उद्योजकास कंपनीतून काढून टाकलेल्या कामगाराने साथीदारांच्या मदतीने लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घडली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी उद्योजकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून उद्योजकांना संरक्षण देण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते. त्यामुळे उद्योजकांनी देखील समाधान व्यक्त केले होते. त्यातच शहरातील पोलीस आयुक्तपदी प्रवीण पवार यांची बदली झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील संघटित गुन्हेगारीसह उद्योजकांवर होणारे हल्ले कमी करून उद्योजकांना पुरक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


सम्बन्धित सामग्री