नवी दिल्ली: झोमॅटो आणि ब्लिंकिट सारखी अॅप्स वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या दोन्ही कंपन्यांची मूळ कंपनी असलेल्या इटरनलने शेअर बाजारात मोठी भरारी घेतली आहे. 22 जुलै 2025 रोजी एटरनलचा शेअर तब्बल 15% वाढून 311.25 वर पोहोचला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 40 हजार कोटींनी वाढले.
इटरनलच्या कमाईत जबरदस्त वाढ -
जून तिमाहीत इटरनलने 7,167 कोटींचे उत्पन्न मिळवले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 70% जास्त आहे. यामुळे कंपनीच्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - अँथम बायोसायन्सेसची ब्लॉकबस्टर लिस्टिंग! पहिल्याच दिवशी 27 टक्के नफा
दीपिंदर गोयल यांच्या संपत्तीत मोठी वाढ -
कंपनीचे CEO दीपिंदर गोयल यांच्याकडे असलेले 36.94 कोटी शेअर्स या वाढीमुळे 1,667 कोटींनी अधिक मूल्यवान झाले. त्यांची एकूण संपत्ती आता 11,071.86 कोटी झाली आहे.
हेही वाचा - सोशल मीडिया रील बनवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकार देत आहे 'ही' उत्तम संधी
ब्लिंकिट बनले गेमचेंजर -
या तिमाहीत ब्लिंकिटने पहिल्यांदाच झोमॅटोच्या अन्न वितरणाला मागे टाकलं. नेट ऑर्डर व्हॅल्यूमध्ये ब्लिंकिट आघाडीवर राहिलं असून बाजार विश्लेषकांनीदेखील त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. या यशानंतर इटरनलने विप्रो, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स आणि सिप्ला यासारख्या दिग्गज कंपन्यांनाही मागे टाकलं आहे.
Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!