Sunday, August 17, 2025 04:09:38 PM

अजब-गजब रिवाज: या देशात घरांच्या भिंतींवर लावले जातात पत्नीचे फोटो; मात्र, अद्यापही महिलांना नाही 'हा' अधिकार

ही आहे अशा एका देशाची कहाणी, जिथे लोक त्यांच्या घराच्या भिंतींवर त्यांच्या पत्नींचे फोटो लावतात. काही घरांमध्ये एकापेक्षा जास्त बायकांचे फोटो दिसतात.

अजब-गजब रिवाज या देशात घरांच्या भिंतींवर लावले जातात पत्नीचे फोटो मात्र अद्यापही महिलांना नाही हा अधिकार

Interesting And Weird Facts : जगातील प्रत्येक देशाची स्वतःची अशी  कुठली ना कुठली संस्कृती आहे. प्रत्येक देशाचं काही ना काही वेगळं असं वैशिष्ट्य आहे. तर, आज अशाच एका देशाविषयी जाणून घेऊ. हा असा देश आहे, जिथे घराच्या भिंतींवर पत्नींचे फोटो लावले जातात. 

जगातील जवळजवळ प्रत्येक देशात याबद्दल काही मनोरंजक तथ्ये आहेत. ब्रुनेई हा देखील असाच एक देश आहे. हा मुस्लीम बहुल देश आहे; म्हणजेच, इथे मुस्लीम लोक मोठ्या प्रमाणात राहतात. येथील मनोरंजक तथ्ये तुम्हाला आश्चर्यचकित करतील. इंडोनेशियाजवळ असलेल्या या देशात अजूनही राजेशाही आहे; म्हणजेच, येथे राजा आणि राजघराणं राज्य करतं.

हेही वाचा - ही कोण आहे माहितीये? ऐश्वर्या राय..? मुळीच नाही.. ही तर पाकिस्तानची..

महिलांना नाही मतदानाचा अधिकार
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आजही ब्रुनेई या देशात महिलांना मतदानाचा अधिकार नाही. या देशाच्या राजधानीचे नाव ब्रुनेई टाउन आहे आणि ते या देशातील सर्वात मोठे शहर आहे. इतर अनेक देशांप्रमाणे, हा देश देखील ब्रिटिशांचा गुलाम होता. या देशाला 1 जानेवारी 1984 रोजी स्वातंत्र्य मिळाले.

घराच्या भिंतींवर पत्नीचा फोटो
या देशात घराच्या भिंतींवर पत्नीचा फोटो लावण्याची इथे प्रथा आहे. काही घरांमध्ये एकापेक्षा जास्त बायकांचे फोटो दिसतात. याशिवाय, भिंतीवर सुलतानाचेही चित्रही दिसते.

इथला राजा जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक
ब्रुनेईचे सुलतान हसनल बोलकिया हे जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक मानले जातात. 2008 मध्ये एक अहवाल आला होता, ज्यामध्ये त्यांची संपत्ती सुमारे 1363 अब्ज रुपये असल्याचे म्हटले होते. त्याला गाड्या खूप आवडतात आणि म्हणूनच त्याच्याकडे सुमारे 7 हजार गाड्या आहेत. हसनल बोलकिया यांची वैयक्तिक कार सोन्याने मढवलेली आहे. सुलतान ज्या राजवाड्यात राहतो तो जगातील सर्वात मोठा निवासी राजवाडा मानला जातो आणि त्यात 1700 हून अधिक खोल्या आहेत.

सार्वजनिक ठिकाणी या गोष्टींना मनाई
ब्रुनेईमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मनाई आहे. एवढेच नाही तर येथील लोक रस्त्यावर चालताना काहीही खाणे किंवा पिणे चुकीचे मानतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील लोकांना फास्ट फूड जास्त खायला आवडत नाही. म्हणूनच येथे मॅकडोनाल्ड्ससारखे रेस्टॉरंट्स क्वचितच दिसतात.

लोकांकडे घरांपेक्षा गाड्याच जास्त
असे म्हटले जाते की येथील लोकांकडे या देशातील घरांपेक्षा जास्त गाड्या आहेत. एका अहवालानुसार, येथे दर हजार लोकांमागे सुमारे ७०० कार आहेत. खरं तर, इथे जास्त गाड्या असण्याचे कारण म्हणजे इथे तेलाच्या किमती खूप कमी आहेत आणि त्याच वेळी लोकांना जवळजवळ कोणताही वाहतूक कर भरावा लागत नाही.

हेही वाचा - Eid al-Adha: बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देऊ नका; या मुस्लिम देशातील राजाचं नागरिकांना आवाहन, हे आहे कारण


सम्बन्धित सामग्री